सनी देओलवर भयंकर चिडले होते चंकी पांडे; न बोलता सेटवरुन गेले होते निघून

फिल्म इंडस्ट्रीतील काही हट्टी आणि रागीट अभिनेत्यांपैकी एक म्हणजे सनी देओल. सनी देओल स्वभावाने खुप शांत आहे. त्याच्याकडे बघून कोणालाही त्याच्या रागाचा आणि हट्टी स्वभावाचा अंदाज येणार नाही. पण खऱ्या आयूष्यात मात्र सनी देओल अतिशय रागीट आणि हट्टी स्वभावाचा आहे.

सनी देओलने एखाद्या गोष्टीचा हट्ट केल्यानंतर तो ती गोष्ट पुर्ण करुनच राहतो. त्याला त्याच्या हट्टी स्वभावामूळे अनेकदा नुकसान होते. पण तरीही तो हट्ट सोडत नाही. हट्टी स्वभावासोबतच सनी त्याच्या मस्करी करण्याच्या सवयीमूळे देखील अनेकदा चर्चेत राहिला आहे.

८० च्या दशकामध्ये सनी देओलने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. कमी वेळातच सनीने बॉलीवूडमध्ये यश मिळवले होते. चित्रपटांसोबतच सनी त्याच्या अफेअरमूळे देखील अनेकदा चर्चेत राहायचा. अनेक अभिनेत्यांसोबत सनी देओलची चांगली मैत्री होती.

असाच एक अभिनेता म्हणजे चंकी पांडे. ९० च्या दशकात चंकि पांडेला इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्यांमध्ये गणले जात होते. सनी आणि चंकीची खुप चांगली मैत्री होती. विश्वात्मा चित्रपटात दोघांची पहील्यांदा एकत्र काम केले होते. पण चित्रपट पुर्ण होईपर्यंत दोन्ही कलाकारांमध्ये वाद सुरु झाले होते.

विश्वात्मा चित्रपटाची शुटींग बाहेर देशात सुरु होती. त्यावेळी चंकी पांडेला सिगारेटची खुप जास्त आवड होती. त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सिगरेट घेणे खुप आवडायचे. त्यामूळे बाहेर देशात शुटींगला गेल्यानंतर चंकी तिथले सिगरेट विकत घ्यायचे. ही गोष्ट सनी देओलला समजता त्यांनी मस्करी करण्याचा निर्णय घेतला.

‘विश्वात्मा’ चित्रपटाची शुटींग संपल्यानंतर चंकी पांडेने नेहमीप्रमामे बाहेर देशातील काही सिगारेट घेतल्या. ही गोष्ट सनी देओलला माहीती होती. त्यामूळे सनीने चंकी पांडेने घेतलेल्या सगळ्या सिगारेट घेतल्या आणि सेटवरील लोकांना वाटल्या.

सनीने चंकीला देखील एक सिगारेट दिली. त्यावेळी चंकीला वाटले की, सनीने स्वत या सिगारेट खरेदी केल्या आहेत आणि लोकांना वाटतं आहेत. पण स्वत ची बॅग बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, सनी देओलने आपल्या बॅगतल्या सिगारेट काढल्या आहेत आणि त्या लोकांमध्ये वाटत आहे.

चंकी पांडेला सनी देओलची ही मस्करी बिलकूल आवडली नाही. त्यांनी सनी देओलला सांगितले की, त्यांना ही मस्करी आवडली नाही. चिडलेल्या चंकीने रागात सनी देओलकडून सगळे सिगारेट घेतले आणि परत बॅगेत टाकले. एवढेच नाही तर सनीने ज्या ज्या लोकांना सिगारेट दिले होते. त्यांच्याकडूनही चंकीने सिगारेट घेतली.

चंकी पांडे दरवाजाच्या बाहेर थांबून प्रत्येक व्यक्तिकडून सिगारेट परत घेतली होती. हे सगळं काही बघू सनीने चंकीला सांगितले की, आपण मोठ्या मनाने वागावे. सगळं काही घेण्यापेक्षा काही गोष्टी दिलेल्या चांगल्या असतात. पण चंकीला मात्र ही गोष्ट आवडली नाही. चंकी रागारागात निघून गेले.

महत्वाच्या बातम्या –
स्मिता पाटीलच्या मृत्यूनंतर तुटलेले राज बब्बर रेखाच्या प्रेमात झाले होते पागल
करोडोंच्या संपत्तीचा मालक असला तरी वडील सलीन खानचे एक स्वप्न अजूनही पुर्ण शकला नाही सलमान खान
संपत्तीच्या बाबतीत मोठ्या मोठ्या अभिनेत्यांना मागे टाकते ‘सिंघम’ चित्रपटातील अजय देवगनची अभिनेत्री
तारक मेहतामधील दयाबेनने केले होते बी-ग्रेड चित्रपटात काम; बोल्डनेसची सर्वच हद्द केली होती पार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.