Share

छत्रपती संभाजीराजेंचा सवता सुभा, “स्वराज्य” संघटनेची स्थापणा; निवडणूकही लढणार..

Yuvraj-Sambhaji-Raje-Chatrpati.

भाजपचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एका नव्या संघटनेची घोषणा केली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना केली आहे. तसेच यावर्षीची राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचे देखील सांगितले आहे. पुण्यात(Pune) झालेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.(chtrapati sambhajiraje form new organization called swarajy_

भाजपचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेचा कार्यकाळ ३ मे ला संपला होता. त्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती कोणत्या नवीन पक्षात जाणार की नवीन पक्ष स्थापन करणार का? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला होता. या प्रश्नाचे उत्तर आज महाराष्ट्रातील जनतेला मिळाले आहे.

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती ‘स्वराज्य’ या नव्या संघटनेची घोषणा केली आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “या संघटनेच्या माध्यमातून देशातील शिवप्रेमींना आणि शाहूप्रेमींना आपण एकत्र आणणार आहोत. तसेच स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून देखील तयार करण्यात येणार आहे”, असे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणाले की, “मी खासदार असताना अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. यापुढे देखील स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून मी जनतेला मदत करणार आहे. मी केलेल्या कामाची दखल घेऊन लोकांनी मला पाठिंबा द्यावा”, असं आवाहन माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.

यावर्षीची राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचे देखील माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. यावेळी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विरोधी पक्षनेते पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील आभार मानले आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मला भाजपकडून राज्यसभेत खासदार म्हणून पाठवले. मी त्यांचा आभारी आहे”, असे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नवीन संघटनेची घोषणा केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ‘स्वराज्य’ संघटना लवकरच राजकीय क्षेत्रात पाऊल टाकणार असल्याचे संकेत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या पत्रकार परिषदेत दिले आहेत. त्यामुळे इतर राजकीय पक्षांच्या अडचणी वाढल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
पोलिस असल्याचे सांगत भोसरी पोलिस ठाण्यात तरुणीने घातला गोंधळ; सत्य समोर आल्यावर सगळेच हादरल
डुप्लिकेट सलमान खानला दबंगगिरी पडली महागात, पोलिसांनी ‘या’ कारणामुळे केली अटक
२२ वर्षांचा संसार मोडत हिमेश रेशमियानं केलं होतं दुसरं लग्न, ‘या’ कारणामुळे तुटलं पहिलं नातं

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now