Share

खाण्यापिण्याचे, पैशांचे आमिष दाखवून करायचे धर्मपरिवर्तन, पोलिसांनी धर्मगुरूंच्या आवळल्या मुसक्या

गोव्यात ख्रिस्ती धर्मगुरूंना पोलिसांनी बेकायदेशीर धर्मपरिवर्तन करण्याच्या प्रकरणात ताब्यात घेतले आहे. हे ख्रिस्ती धर्मगुरू बेकायदेशीर पद्धतीने लोकांचे धर्मपरिवर्तन करत होते. तसेच धर्मांमध्ये द्वेष पसरवण्याचा देखील प्रयत्न करत होते. या प्रकरणी गोवा(Goa) पोलिसांनी कारवाई करत या दोन ख्रिस्ती धर्मगुरूंना अटक केली आहे.(Christian pastor arrested by goa police)

अटक करण्यात आलेल्या ख्रिस्ती धर्मगुरूंचे नाव डॉमनिक डिसोझा आणि जॉन मास्कारेन्हान्स असे आहे. आरोपी डॉमनिक डिसोझा आणि जॉन मास्कारेन्हान्स हे शिवोली येथील फोर्थ पीलर चर्चमध्ये कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, गोवा पोलिसांनी गुरुवारी रात्री शिवोली येथून डॉमनिक डिसोझा आणि जॉन मास्कारेन्हान्स यांना अटक केली आहे.

त्यांच्यावर धार्मिक भावना भडकावणे तसेच हल्ले करणे या आरोपांच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. प्रकाश खोबरेकर नावाच्या व्यक्तीने डॉमनिक डिसोझा आणि जॉन मास्कारेन्हान्स या ख्रिस्ती धर्मगुरूंच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, डॉमनिक डिसोझा आणि जॉन मास्कारेन्हान्स या ख्रिस्ती धर्मगुरूंनी बेकायदेशीर पद्धतीने एका व्यक्तीचे धर्मपरिवर्तन केले होते.

या ख्रिस्ती धर्मगुरूंनी धार्मिक भावना दुखावल्या जातील या उद्देशाने त्या व्यक्तीला धमकावलं होतं. तसेच त्याला धर्मपरिवर्तन करण्यासाठी आमिष देखील दाखवण्यात आलं होतं, अशी माहिती प्रकाश खोबरेकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत देण्यात आली आहे. ख्रिस्ती धर्मगुरू डॉमनिक डिसोझा आणि जॉन मास्कारेन्हान्स नागरिकांना खाण्यापिण्याचे, पैशांचे आमिष दाखवून धर्मपरिवर्तन करायला सांगत असत.

यापूर्वी देखील त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात होत्या. ख्रिस्ती धर्मगुरू डॉमनिक डिसोझा आणि जॉन मास्कारेन्हान्स यांच्याविरोधात सध्या बेकायदेशीर धर्मपरिवर्तन प्रकारातील आठ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी याआधी त्यांना समज देऊन सोडून दिले होते. पण आता पोलिसांनी या दोन्ही ख्रिस्ती धर्मगुरूंवर कारवाई करत त्यांना अटक केली आहे.

स्थानिक रहिवाशांनी देखील डॉमनिक डिसोझा आणि जॉन मास्कारेन्हान्स या ख्रिस्ती धर्मगुरूंच्या चुकीच्या कामकाजाबाबत तक्रार केली होती. काही दिवसांपूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एका कार्यक्रमात बेकायदेशीर धर्मपरिवर्तन प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या :-
हनुमान चालीसेचा आग्रह धरणाऱ्या तरुणाला नवनीत राणा म्हणाल्या, ‘कानाखाली लावेन’, ऑडिओ व्हायरल
शाहरूख म्हणाला, माझ्या घरी ३०-४० लाखांचा टिव्ही; युजर्स म्हणाले, शाहरूखला दाखवण्याची..
खाकी वर्दी घालून इंग्रजीत बोलणारा निघाला तोतया अधिकारी, MPSC पास न झाल्याने निवडचा चुकीचा मार्ग

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now