बाबो! ख्रिस मॉरिस ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, किंमत वाचून धक्का बसेल

दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू ख्रिस मॉरिसला यंदाच्या आयपीएल हंगामात १६ कोटी २५ लाख रूपयांना राजस्थान रॉयल्स संघाने विकत घेतले आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याच खेळाडूला इतकी बोली लागली नव्हती. त्याला राजस्थान रॉयल्स संघाने सामिल करत सर्वात महागडा बोली लागलेला खेळाडू ठरवला आहे.
या आधी भारताचा खेळाडू युवराज सिंगला दिल्ली डेअरडेव्हिल्सनं १६ कोटी रूपयांना संघात सामिल केलं होतं. आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू म्हणून त्याच्या नावावर रेकॉर्ड होता. त्याचा रेकॉर्ड यंदा ख्रिस मॉरिसने मोडला आहे.
Base price – INR 75 Lac
Sold for – INR 16.25 Cr@rajasthanroyals win the bidding war to bring @Tipo_Morris on board. 🔥🔥@Vivo_India #IPLAuction pic.twitter.com/m5AMqKE1Dy— IndianPremierLeague (@IPL) February 18, 2021
ख्रिस मॉरिसला आपल्या संघात घेण्यासाठी पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि मुंबई इंडियन्स या तीन संघात चढाओढ लागली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूला आपला जुना खेळाडू ख्रिस मॉरिस संघात खेळण्यासाठी पाहिजे होता. त्यांनी माघार घेतल्यानंतर पंजाब व राजस्थानमध्ये चुरस रंगली आणि राजस्थान रॉयल्सने ख्रिस मॉरिसला १६ कोटी २५ लाखांना संघात सामिल करून घेतले.
आयपीएलमध्ये सर्वाधिक बोली लागलेले खेळाडू-
युवराज सिंग-(दिल्ली कॅपिटल्स, १६ कोटी, २०१५)
पॅट कपिन्स-(कोलकाता नाईट रायडर्स, १५.५ कोटी, २०२०)
ग्लेन मॅक्सवेल-(रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू, १४.२५ कोटी, २०२१)
बेन स्टोक्स-(रायझिंग पुणे सुपरजायंट्स, १४.५ कोटी, २०१७)
युवराज सिंग-(रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू, १४ कोटी, २०१४)
महत्वाच्या बातम्या
फलंदाजी करताना हार्टॲटॅक आला, क्रिकेटपटूने पिचवरच सोडला प्राण; व्हिडीओ पाहून धक्का बसेल
धडाकेबाज शतक झळकवत रोहितचे टीकाकारांना बॅटमधून चोख उत्तर
चहलच्या बायकोसोबत श्रेयस अय्यरने केलेला ‘हा’ डान्स पाहून तुमचेही पाय थिरकतील; पहा व्हिडीओ…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.