धनंजय मुंडेवरील आरोप मागे घेणाऱ्या रेणू शर्मावर गुन्हा दाखल करा; भाजपची मागणी

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेण्यात आली आहे. यावर भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राजकारणात खळबळ उडाली होती. पण यानंतर रेणु शर्मा यांनी ही तक्रार मागे घेतली. कौटुंबिक कारणं आणि या प्रकरणाचं राजकारण होत असल्याने तक्रार मागे घेत असल्याचे महिलेने म्हटले आहे.

धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार पीडित महिलेकडून मागे घेतल्यानंतर चित्रा वाघ यांनी रेणु शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वाघ यांनी केली आहे. “खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर आयपीसी १९२ नुसार मुंबई पोलिसांनी तिच्यावर कारवाई करावी”, अशी विनंतीच चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांना केली आहे.

“धनंजय मुंडे यांच्यावर जेव्हा बलात्काराचा आरोप झाला ही धक्कादायक बाब होती. पण आज बलात्काराची तक्रार मागे घेतली हे सुद्धा तितकेच धक्कादायक आहे. आम्ही या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु, आज रेणू शर्माने आरोप मागे घेतला आहे. त्यामुळे तिच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.” अशी मागणीच चित्रा वाघ यांनी केली आहे.

तसेच “एखाद्या व्यक्तीवर खोटे आरोप करायचे हा धक्कादायक प्रकार आहे. अशा पद्धतीने जर कुणी खोटे आरोप करत असेल तर हे अत्यंत गंभीर आहे. अशा प्रकारामुळे ज्या खऱ्या पीडिता आहे त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन हा वेगळा होऊन जातो.”

‘या’ कारणामुळे भारतात कोरोना लस घेण्यासाठी घाबरताहेत लोक; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती

धनंजय मुंडेंना दिलासा! रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे; दिले ‘हे’ स्पष्टीकरण

‘…म्हणून मी धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेते’; रेणू शर्माने दिले स्पष्टीकरण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.