“कायदा सुव्यवस्थेचे धिंदवडे महाराष्ट्रात कधीच निघाले नव्हते, शिवाजी महाराज असते तर यांचा कडेलोट केला असता”

मुंबईच्या साकीनाका परिसरात घडलेल्या बलात्कार प्रकरणामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या परिसरात एका महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. तिला रुग्णालायत दाखल करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला आहे.

या घटनेमुळे सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. अशातच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राजवाडी रुग्णालयात जाऊन महिलेच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. यावेळी संतप्त शब्दांत चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

सरकार म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंदवडे महाराष्ट्रात आजपर्यंत निघाले नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर यांचा कडेलोट केला असता, अशी टीका चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

खरंतर आता मी निशब्द आहे. माझ्याकडे या विषयावर बोलायला माझ्याकडे शब्द नाही. ज्या पद्धतीने पीडितेवर अत्याचार झाला, तो राक्षसी होता. ज्या पद्धतीने हे अत्याचार चालले आहे, ते कुठे तरी थांबायला हवे. महाराष्ट्राच्या महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

साकीनाक्यातील महिला मृत्युशी झुंज देत होती आणि आता तर तुम्ही तिला बघितलं. आपण काहीही करु शकलो नाही. ज्या पद्धतीने या महिलेवर अत्याचार करण्यात आले आहे, ते निश्चितपणे एका माणसाचे काम नाही, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

तसेच राज्याच्या महिला आयोगाला अध्यक्ष नाही. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. ज्या प्रकारे अल्पसंख्यांकारवर अत्याचार रोखण्यासाठी कायदा आहे. त्याप्रमाणे महिला ऍस्ट्रोसिटीचाही कायदा आणा, त्यासाठी कमिट्या स्थापन करा, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

श्रीलंकेने कर्जापायी चीनला दिली जमीन; भारतासमोर उभे ठाकणार ‘हे’ मोठे संकट
गुजरातच्या मुख्यमंत्री पदासाठी चंद्रकांत पाटलांसह ‘या’ बड्या नेत्यांचं नाव आघाडीवर
अक्षय कुमारने वाढदिवसाच्या दिवशी आईसोबत फोटो शेअर करून लिहिले असे काही वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.