‘दरेकर काहीही चुकीचे बोललेले नाहीत, पुणे पोलिसांनी बावळटपणा केला आहे’

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. ते त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपुर्वी शिरूर येथे त्यांनी एका कार्यक्रमात एक वक्तव्य केलं होतं ज्यामुळे वाद निर्माण झाला होता. राष्ट्रवादीने त्याच्यावर आक्षेप घेतला होता.

त्यांनी वक्तव्य केलं होतं की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे. त्यानंतर अनेक विरोधी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. दरेकर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पुण्यात सिंहगड ठाण्यात दरेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर आता या प्रकरणावरून भाजप नेत्या चित्र वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुणे पोलिस प्रशासनावरच टीका केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, पोलिसांनी दरेकरांचे भाषण पुर्ण न ऐकताच गुन्हा दाखल केला आहे. ओढूनताणून आणलेला हा निव्वळ बावळटपणा आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रस्थापित आणि साखरसम्रांटाचा पक्ष आहे. रंगलेल्या आणि साखरसम्राटांचा पक्ष आहे. रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे असे दरेकर म्हटले होते. पण ते काही चुकीचे बोलले नाहीत. रंगलेले गाल हे बाईचेच का वाटावे? ज्या गोष्टीला काही शेंडा नाही, बुडखा नाही.

त्याचा फक्त बागुलबुवा करून ठेवलेला आहे. पुणेकरांची मराठी चांगली आहे. मग त्यांनी वाक्याचे अनर्थ का काढावे? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. चित्रा वाघ असेही म्हणाल्या की, दरेकरांच्या भाषणामध्ये बाईचा ब सुद्धा नाही. सुरेखा पुणेकरांचा तर त्यांनी उल्लेखही केला नव्हता.

पुणे पोलिसांनी दरेकरांचे भाषण पुर्ण न ऐकताच गुन्हा दाखल केला. अत्याचाराचा इतक्या घटना होतात त्याकडे लक्ष का दिले जात नाही? ओढून ताणून आणलेला हा निव्वळ बावळटपणा आहे. दुसरे काहीही नाही, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी आणि पुणे पोलिसांवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या
रुपाली चाकणकरांनी दाखल केली भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याविरोधात तक्रार; म्हणाल्या, मला न्याय मिळेल अशी अपेक्षा
कोरोनाने मृत्यु झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार ५० हजार; घोषणा मोदींची, पैसे मात्र राज्यांचे
बिग बॉसच्या घरात कीर्तनकार शिवलीला ढसाढसा रडली; समोर आले हैराण करणारे कारण
साडी घातली म्हणून महिलेला हाॅटेलबाहेर काढले; दिल्लीतील संतापजनक प्रकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.