“वाट कसली बघताय? मंत्री संजय राठोडांच्या मुसक्या आवळा”

मुंबई | पुण्यातील वानवडी येथे पुजा चव्हाण नावाच्या तरुणीने आत्मह.त्या केली. २३ वर्षीय असलेल्या या तरुणीने रविवारी (ता.७) रात्री इमारतीवरून उडी मारून आत्मह.त्या केली आहे. ही तरुणी मुळची बीड जिल्ह्यातील परळीची आहे. या युवतीचे राज्य सरकारमधील एका मंत्र्याशी संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

अशातच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट गंभीर आरोप केले आहेत. संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. पोलिसांनी वाट न बघता थेट संजय राठोड यांच्या मुसक्या आवळा, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

याबाबत माध्यमांशी बोलताना त्या म्हणतात, ‘पूजा चव्हाणची आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर दोन दिवसात ज्या काही अपडेट येत आहेत ते व्हायरल होत आहे. काही ऑडिओ क्लिप सोशल मीडियाद्वारे समोर येत आहेत. त्या सर्व क्लिप धक्कादायक आहेत. या सगळ्या गोष्टींचा रोख मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे.

भाषणात महिला सुरक्षेवर बोलणं सोपं असतं. आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाई करावी. एवढे पुरावे असताना तुम्ही आता वाट कुणाची बघत आहात? अशा लोकांच्या मुसक्या आवळायलाच हव्यात”, असे चित्रा वाघ यांनी म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
पूजा चव्हाण आत्मह.त्या प्रकरण! पंकजा मुंडेंनी केली ‘ही’ मागणी; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
पुजा चव्हाण आत्मह.त्या प्रकरणात सेनेच्या मंत्र्याचे कनेक्शन उघड? ‘ती’ क्लिप व्हायरल
मानसीने शेअर केला लग्नसोहळ्याचा संपूर्ण व्हिडीओ; मेहंदीपासून संगीतपर्यंत ‘अशी’ केली धमाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.