आता नवा वसुली मंत्री कोण? अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ कडाडल्या

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील आणखी मंत्र्याने राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.

मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

त्या म्हणतात, ‘राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसुली मंत्री कोण?”, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. मंत्रिमंडळातील एखादा चेहरा बदलल्याने महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू काही बदलणार नाही, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया…
अखेर आज अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर माध्यामांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. खरं तर राजीनामा देण्यासाठी उशीरच झाला, असे देखील फडणवीस यांनी म्हटलेलं आहे.

‘खरं म्हणजे मला असं वाटतं की हा राजीनामा देण्यासाठी उशीर झाला. आमची अपेक्षा अशी होती, की इतके गंभीर आरोप लागल्यानंतर आणि रश्मी शुक्लांचा रिपोर्ट बाहेर आल्यानंतर तत्काळ देशमुख यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व शरद पवार यांनी घ्यायला हवा होता. परंतु आता त्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी लागली,’ असे फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

धृपद संस्थान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात; गुंदेचा बंधूंवर विद्यार्थिनींनी केले लैंगिक छळाचे आरोप

“माझे कुटुंब माझी जबाबदारी आणि घरातले सगळेच आजारी”

रविना टंडनने तिच्या सवतीच्या डोक्यात फोडला होता काचेचा ग्लास; कारण ऐकून धक्का बसेल..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.