चीपी विमानतळावरून नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात “सामना”!!

कोकणातील सिंधदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चीपी विमानतळाचे उद्घाटन येत्या ९ ऑक्टोबर रोजी केंद्रिय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल माहिती दिली. चिपी विमानतळाच्या श्रेय वादावरून पुन्हा एकदा नारायण राणे आणि शिवसेना आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत.

तसे पाहता केंद्रिय सूक्ष्म लघुमध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांचा वाद संपुर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हा वाद विकोपाला गेला होता, तो वाद शमतो ना शमतो आता पुन्हा एकदा चिपी विमानतळावरून नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात भडका उठणार आहे.

चीपी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार असल्याने अख्या महाराष्ट्राचे लक्ष्य या उद्घटनाकडे लागून आहे. नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार असल्यामुळे उद्घाटनाला मुख्यमंत्री पाहिजेतच असं नाही’ असं वादग्रस्त विधान केले.

यावर शिवसेनेचे खासदार विनायक राउत यांनी मुख्यमंत्री उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावणार असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनुसार चिपी विमानतळाच्या उद्धाटनाची तारीख ठरली आहे. त्यामुळे नारायण राणेंना कोणी यायचं कोणी येऊ नये हा अधिकार कोणी दिला अश्या शब्दात राणे यांच्यावरती पलटवार केला आहे.

राणेंच्या वक्तव्यावरून भाजप नेते असहमत असल्याचे दिसते. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सावध भूमिका घेत सांगितले की मुख्यमंत्र्यांचा सन्मान झालाच पाहिजे. चिपी विमानतळ भलेही शिवसेनेमुळे उभे राहिले नसेल आणि भाजपने चिपी विमानतळ उभारण्यासाठी श्रम घेतले असेल तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा सन्मान झालाच पाहिजे.

नियमानुसार एखाद्या राज्यात कोणत्याही प्रकल्पाचे उद्घाटन होत असेल तर त्या कार्यक्रमाचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना द्यावेच लागते. त्यामुळे मुख्यमंत्री आणि नारायण राणे हे एकच मंचावर येणार हे जवळपास निश्चित असून उद्घाटनाच्या वेळी नारायण राणे आणि शिवसेना जोरदार शक्ती प्रदर्शन करणार यात काही शंका नाही. राणे आणि ठाकरे यांच्या वादामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण राजकारण चांगलेच ढवळले असून राजकारणातील हे अस्थिरतेचे चटके कधी पर्यंत महाराष्ट्राला सोसावे लागतील याबद्दल अंदाज बांधणे कठीण होऊन बसले आहे.

 

महत्वाच्या बातम्या
हाय कॉलेस्ट्रॉलपासून हवीय सुटका? हे जालीम सल्ले पाळा आणि कॉलेस्ट्रॉलला बाय बाय बोला
उपचारासाठी पत्नीला खांद्यावर घेऊन पायी निघाला, पतीच्या खांद्यावर पत्नीचा करुण अंत झाला..
पैसा जवळ टिकत नाही? जाणून घ्या, तज्ञांच्या मते पैसे वाचवण्याचे सोपे मार्ग…

सावधान! ‘या’ तारखेपर्यंत इनकम टॅक्‍स रिटर्न नाही भरला तर भरावा लागणार जाणार ‘जबर’ दंड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.