सध्या अभिनेता चिन्मय मांडलेकर याची सर्वत्र चर्चा होत आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी ‘पावनखिंड’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती. तसेच चिन्मय मांडलेकर यांनी ‘द काश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटात ‘बिट्टा’ हि भूमिका साकारली आहे. या दोन्ही चित्रपटांमधील भूमिका परस्पर विरोधी आहेत. पण अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी या दोन्ही भूमिका उत्तमरित्या साकारल्या आहेत.(chinmay mandelkar says news anchor viral video )
याकरिता अभिनेता चिन्मय मांडलेकर यांचे प्रेक्षक भरभरून कौतुक करत आहेत. अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या निमित्ताने एका हिंदी वृत्त वाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील एका कृतीमुळे अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी अनेकांची मने जिंकली आहेत.
सोशल मीडियावर लोक अभिनेता चिन्मय मांडलेकर यांचे कौतुक करत आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर यांची एका हिंदी वृत्त वाहिनीने मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारताना न्यूज अँकरने छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला. त्यावरून अभिनेता चिन्मय मांडलेकर त्या न्यूज अँकरला मध्येच थांबवत ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असं म्हणाले.
यानंतर ही चूक न्यूज अँकरच्या लक्षात आली आणि त्याने त्याबाबत स्पष्टीकरण देण्यास सुरवात केली. हा व्हिडिओ अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत असताना “कारण काही गोष्टी ऑप्शनल नसतात. कधीच. चित्रपती शिवाजी महाराज की जय”, असे कॅप्शन दिले आहे.
या व्हिडिओवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “आम्हाला तुझा सार्थ अभिमान वाटतो…”, अशी प्रतिक्रिया एका व्यक्तीने या व्हिडिओवर दिली आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर यांच्या पत्नीने देखील या व्हिडिओवर कमेंट करत त्याचे कौतुक केलं आहे. “दिगपाल आणि तू तुम्हा दोघांची महाराजांबद्दल असलेली भक्ती हे पदोपदी दिसून येते. हे किती सुरेख आहे…निर्मळ आहे…त्यांचा आशीर्वाद असाच तुम्हा दोघांबरोबर आणि त्यांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्याबरोबर राहो”, अशी प्रतिक्रिया चिन्मयची पत्नी नेहाने दिली आहे.
‘पावनखिंड’ चित्रपटाचे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांनी देखील हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. “निव्वळ अभिमान…निव्वळ अभिमान…मित्रा चिन्मय, माझ्या माहितीतला सर्वोत्कृष्ट अभिनेता, माझा जवळचा मित्र, माझा भाऊ म्हणून तुझा अभिमान होताच. परंतु, आजच्या या कृतीने यशाच्या वेगळ्या शिखरावर असताना सुद्धा तू आपल्या दैवताला विसरला नाहीयेस हे पाहून अभिमानाने ऊर भरून आला. छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या पदरात अशाच प्रकारच्या यशाच्या ओंजळीचा कृपाप्रसाद घालत राहोत ही त्यांच्या चरणी प्रार्थना. जय शिवराय. हर हर महादेव”, अशी कमेंट दिगपाल लांजेकर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :–
बिल्डरने पोलीसालाच धमकावले; नितीन नांदगावकरांचा फोन जाताच आला वठणीवर; पहा व्हिडीओ
बांगलादेशला धूळ चारत भारताचा मोठा विजय; वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये जाण्याचा रस्ता सुकर
‘शेर शिवराज’ चित्रपटात अफजल खानाच्या भूमिकेत दिसणार बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता