चीनचे अनियंत्रीत राॅकेट अखेर भारताजवळ ‘इथे’ कोसळले; नेमके कुठे कोसळले ते राॅकेट? वाचा..

कोरोनानंतर चीनच्या आणखी एका चुकीमुळे पुर्ण जग चिंतेत पडले होते, ते म्हणजे गेल्या आठवड्यात चीनने अंतराळात सोडलेले रॉकेट. एप्रिल महिन्यात चीनने एक रॉकेट सोडले होते, मात्र ते अंतराळात जात असतानाच त्या रॉकेटचे नियंत्रण सुटले होते.

हे रॉकेट ८ मे रोजी पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करणार होते. अशात कोणत्या भागात हे रॉकेट पडेल हे सांगणे शास्त्रज्ञांना सुद्धा कठिण झाले होते. त्यामुळे गावे उध्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात होती. आता मात्र हे रॉकेट भारताच्या समुद्रात कोसळले आहे. त्यामुळे संपुर्ण जगाने सुटकेचा श्वास घेतला आहे.

काही वेळापुर्वी चीनचे हे रॉकेट न्यु यॉर्क, माद्रीद आणि बिजिंगवरुन पुढे सरकले होते. शेवटी हे रॉकेट चिली आणि न्युझिलंडच्या आकाशात दिसले होते. हे रॉकेट ९० मिनिटांमध्ये पृथ्वीला प्रदक्षिणा मारत होते.

सेकंदाला ७ किलोमीटर इतका प्रचंड वेग असणारे हे रॉकेट आता कोसळले आहे. चीनी माध्यमांनुसार हे रॉकेट भारताच्या दक्षिणपुर्व आणि श्रीलंकेच्या आजुबाजूला कुठेतरी कोसळले आहे.

तसेच हे रॉकेट कोसळल्यामुळे काय नुकसान झाले आहे याबाबतची अजून माहिती मिळालेली नाही. तरी समुद्रात कोसळल्याने कोणतेही नुकसान झालेले नसण्याची शक्यता आहे.

चीनने गेल्याच आठवड्यात स्पेस स्टेशन बांधण्यासाठी हे लाँगमार्च ५ बी हे रॉकेट अंतराळात पाठवले होते. हे रॉकेट २९ एप्रिलला लाँच करण्यात आले होते. गेल्यावेळी या रॉकेटमधून धातूच्या सळ्या बाहेर पडून पृथ्वीवर कोसळल्या होत्या. त्यामधल्या काही सळ्या या आकाशातच जळाल्या होत्या. तर काही सळ्यांमुळे इमारतींचे नुकसान झाले होते.

महत्वाच्या बातम्या-

भाजप खासदाराने ३० रुग्णवाहिका लपवून ठेवल्या होत्या घरात; असा झाला पर्दाफाश
लॉकडाऊनमध्ये पठ्ठ्याचा भन्नाट जुगाड, शेतातूनच काढली वरात; पहा भन्नाट व्हिडिओ
हॅकिंगच्या जोरावर या मुलाने उभी केली करोडो रूपयांची कंपनी, एकेकाळी आठवीला झाला होता नापास

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.