भारतात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे लोकांची जीवनपद्धती बदलली आहे. आता लोक रोख व्यवहार करण्याऐवजी डिजिटल(Digital) पद्धतीने पैशांची देवाणघेवाण करत आहेत. त्यामुळे अनेकदा लोक भिकाऱ्यांना देण्यासाठी त्यांच्याकडे सुटे पैसे नाहीत, अशी सबब देतात. यावर एका भिकाऱ्याने अनोखी शक्कल लढवली आहे.(chindwada bhikari take online payment from people)
या भिकाऱ्याने भीक देण्यासाठी लोकांसमोर ऑनलाइन(Online) पेमेंटचा पर्याय उपलब्ध केला आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा(Chindwada) येथे राहणारा हा भिकारी सध्या चर्चेत आहे. त्याचे नाव हेमंत सूर्यवंशी असे आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या या युगात आता भिकारी देखील स्वत:ला अपडेट करत आहेत. भिकारी हेमंत सूर्यवंशी बारकोड स्कॅनरद्वारे ऑनलाइन पद्धतीने लोकांकडून भीक घेतो.
याबाबत भिकारी हेमंत सूर्यवंशी यांनी सांगितले की, जेव्हा ते बहुतेक लोकांना भीक मागायचे, तेव्हा बरेच लोक त्यांना चिल्लर नसल्याचे कारण द्यायचे. यावर उपाय म्हणून त्यांनी बारकोडच्या माध्यमातून भीक मागायला सुरुवात केली. जे लोक चिल्लर नसल्याची बतावणी करतात त्या लोकांकडून हेमंत बारकोडद्वारे भीक मागतात.
भिकारी हेमंत सूर्यवंशी यांच्या भीक मागण्याच्या पद्धतीची सध्या चर्चा होत आहे. भिकारी हेमंत लोकांकडे भीक मागताना, ‘बाबूजी चिल्लर नहीं तो फोन-पे या गूगल-पे से भीक दे दो’ अशी विनवणी करतात. सध्या डिजिटल तंत्रज्ञान आल्यामुळे लोकांकडे भीक देण्यासाठी सुटते पैसे नसतात, असे भिकारी हेमंत यांनी सांगितले.
त्यामुळे बारकोडच्या माध्यमातून लोक आपल्याला भीक देतात, असे भिकारी हेमंत यांनी सांगितले. भिकारी हेमंत सूर्यवंशी यापूर्वी महापालिकेत नोकरी करत होते. नोकरी सुटल्यानंतर हेमंत अनेक दिवस नैराश्यात होते. सध्या त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी हेमंत सूर्यवंशी भीक मागत आहेत.
छिंदवाडा परिसरातील लोक भिकारी हेमंत सूर्यवंशी यांना हेमंत बाबांच्या नावाने ओळखतात. या परिसरातील लोक त्यांना बारकोड स्कॅनकरून भीक देतात. भिकारी हेमंत सूर्यवंशी यांच्या या अनोख्या भीक मागण्याच्या पद्धतीची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. हेमंत यांचे अनुकरण करून इतर भिकारी देखील आता ऑनलाइन पेमेंटद्वारे भीक मागताना दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
व्यक्तीने जाहीरपणे विचारली होती बबीताला एका रात्रीची किंमत, अभिनेत्रीने केले होते ‘हे’ काम
चारा घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांना ५ वर्षांची शिक्षा आणि ६० लाखांचा दंड, कोर्टाचा मोठा निर्णय
पिंपरी चिंचवडमध्ये Whats app वर सुरू होते सेक्स रॅकेट, एका रात्रीत २० हजार कमवत होत्या मुली