स्वदेशी म्हणून मिरवणाऱ्या KOO अ‍ॅपमध्ये चीनची गुंतवणूक, कंपनीच्या सीईओची कबुली

मुंबई | सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात बराच वाद झाल्याचे पाहायला मिळाले. शेतकरी आंदोलनादरम्यान चुकीची माहिती पसरवत असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला. यामुळे ट्विटरवर निर्बंध लादण्यात आले. या वादानंतर मेड इन इंडिया ‘KOO’ हे अ‍ॅप लोकप्रिय झाले विदेशी ट्विटरला KOO हे स्वदेशी अ‍ॅप  पर्याय म्हणून लोकप्रिय होत आहे.

अशातच धक्कादायक माहिती समोर आली आहे. मेड इन इंडिया या अ‍ॅपमध्ये चिनी गुंतवणूक असल्याचे समोर आले आहे. KOO कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अप्रम्या राधाकृष्णा यांनी एका मुलाखतीत याची कबुली दिली आहे. ते म्हणाले, KOO अ‍ॅपमध्ये चीनी कंपनीने छोटी गुंतवणूक केली आहे.

कंपनीचे कार्यकारी अधिकारी अप्रम्या राधाकृष्णा यांनी सांगितल्याप्रमाणे ‘शुनवेई कॅपिटल’ या चीनी कंपनीने छोटी गुतंवणूक अ‍ॅपमध्ये केली आहे. परंतु त्यांचा हिस्सा खरेदी करता येऊ शकतो. तसेच शुनवेई लवकरच यातून बाहेर पडेल असेही ते म्हणाले आहेत.

शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान ट्विटरवर आरोप प्रत्यारोपाचे झाल्याचे पाहायला मिळाले. या आंदोलनाच्या संदर्भात चुकीची माहिती पसरवण्यासाठी ट्विटरचा वापर करण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. तसेच सरकारने अनेक ट्विटर अकाऊंटवर निर्बंध लादण्याची मागणी केली. मात्र ट्विटरने याकडे दुर्लक्ष केले होते.

दरम्यान, कू (KOO) या अ‍ॅपची चर्चा होऊ लागली. या सर्व परिस्थितीत अनेक मंत्र्यांनी हे स्वदेशी अ‍ॅप वापरण्याचा सल्ला दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापुर्वी मन की बात कार्यक्रमात या अ‍ॅपचा उल्लेख केला होता. वापरकर्त्यांनीही कू(KOO) ला पसंती दाखवली होती. मात्र याच स्वदेशी अ‍ॅपमध्ये चीनची गुंतवणूक असल्याचे समोर आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
‘अमित शहा यांचेट्विटर हँडल बंद कसे करू शकता?’; भाजपचा ट्विटरला सवाल
“मी तुमच जीवन जगणे कठीण करून ठेवेल”; कंगणाने चक्क ट्विटरलाच दिली धमकी
पंगा क्वीन कंगणाने आता तर थेट ट्विटरच्या CEO सोबत घेतला पंगा
सरकारच्या इशाऱ्यानंतर ट्विटरला जाग; बंद केली ५०० हून अधिक अकाऊंट्स

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.