भारतातील परीस्थीती गंभीर, भारताला कोरोनापासून वाचवण्यासाठी आम्ही तयार आहोत; चीनचे आवाहन

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाघित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात आरोग्य सेवांचा अभाव निर्माण होत आहे.

देशभरात ऑक्सिजन, बेड्स, रेमडेसिवीर औषधांची तुडवडा निर्माण झाला आहे. आता भारताच्या या गंभीर परिस्थितीवर चीनने प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही भारताला मदत करण्यास तयार आहोत, असे चीनने म्हटले आहे.

भारताची परिस्थिती खुप गंभीर आहे. अशा परिस्थितीत चीन भारताच्या मदतीसाठी पुर्णपणे तयार आहे, असे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिग यांनी म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

कोरोना हा संपुर्ण मानवजातीचा शत्रु आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला या महासाथी विरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. भारताची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे भारताला कोरोनापासून वाचवण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे वेनबिग यांनी म्हटले आहे.

तसेच भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याने वैद्यकीय वस्तुंचा पुरवठा तुडवडा निर्माण झाला आहे. अशा स्थितीत आम्ही भारताला आवश्यक त्या वैद्यकीय वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी तयार आहोत, असेही चीनने म्हटले आहे.

दरम्यान, देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसाला लाखोंच्या संख्येत रुग्ण मिळत आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण मिळाले आहे. तर गेल्या दहा दिवसात १५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऑक्सीजनअभावी आणि ICU बेड न मिळाल्याने होणारे मृत्यू हे केंद्र सरकारचे पाप- राहूल गांधींचा थेट आरोप
कोरोनावर औषध शोधणाऱ्या बाबा रामदेव यांच्याच संस्थेत कोरोनाचा शिरकाव, ८३ जणांना कोरोनाची लागण
सलाम! कोरोना रुग्णांना रुग्णालयापर्यंत मोफत रिक्षा प्रवास; पुण्यातील तरुणांचा उपक्रम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.