चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केलाय; आता भाजप खासदारानेच टोचले मोदींचे कान

नवी दिल्ली । गेल्या काही वर्षांपासून भारत चीन सीमा वाद सुरू आहे. दोन्हीकडून सतत वाद सुरू असतात. यावर विरोधक केंद्र सरकारवर सतत टीका करत असतात. आता भाजप खासदार असलेले सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील मोदी सरकारवर टीका केली आहे. ते अनेकदा केंद्र सरकारवर टीका करत असतात.

ते म्हणाले, आता घाबरून चालणार नाही. चीनने भारत आणि भूतानच्या जमिनीवर कब्जा केला आहे. त्यांना घाबरून चालणार नाही. त्यांनी निवृत्त लेफ्टनंट जनरल प्रकाश कटोच यांनी लिहिलेला लेख ट्विट केला आहे.

यामध्ये ते सांगतात की, चीन जगासमोर कोरोना व्हायरसला हत्यार म्हणून वापरत आहे. निशाण्यावर असलेले देश त्यांनी लक्ष केले आहेत. त्यांनी दिखावा केला की कोरोनामुळे आम्ही देखील डबघाईला आलो आहे.

 

चीनने भारतीय सीमेजवळील अनेक प्रदेशात आपले बस्तान बसवले आहे. यामुळे भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्याठिकाणी चिनी गावे निर्माण केली आहेत. भुतानमध्ये सीमेवर तोरसा नदीजवळ एक गाव तयार केले आहे.

तसेच यामध्ये म्हटले आहे की भारतीय सीमेवर चीन रस्ता तयार करत आहे. यावरून त्यांना भारतात घुसखोरी करायला सोपे जाणार आहे. भारतीय सीमेजवळ येण्यासाठी चीनने भूतानजवळ हळूहळू अतिक्रमण करणे सुरूच ठेवले आहे. भविष्यात याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे.

भाजप खासदार असलेले सुब्रमण्यम स्वामी यांनी अनेकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीने देखील केंद्र सरकारवर कोरोनावरून टीका केली होती. यामुळे मोदी सरकार विरोधात असंतोष वाढत चालला आहे.

ताज्या बातम्या

एक चुकीचा शब्द पडला महागात, ‘तारक मेहता..मधील बबितावर विविध ठिकाणी गुन्हा दाखल; जामीनही नाही मिळणार

म्युकर मायकोसिसच्या संकटातूनही मार्ग निघाला; नितीन गडकरींची मोठी घोषणा

सदावर्ते नीट बोल, माजुर्डेपणाची भाषा ऐकून घेणार नाही, विनोद पाटलांनी सदावर्तेना सुनावले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.