चीनकडून काहीच अपेक्षा नाहीत, तुम्ही तरी आॅक्सीजन पाठवा; नेपाळचे भारताला मदतीसाठी साकडे

जगभरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्राणावर वाढत आहे. नेपाळमध्ये पण कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. नेपाळमध्ये हजारोंच्या संख्येने रोज रुग्ण सापडत आहेत. दररोज शेकडो रुग्णांचा पण मृत्यू होत आहे.

नेपाळमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याचा तुटवडा पण मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. नेपाळच्या पंतप्रधान के पी शर्मा यांची अशावेळेला भारताकडे नजर लागून राहिली आहे. त्यांनी भारताने मदत करावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

यासंदर्भात के पी ओली शर्मा यांचे विदेश सल्लागार रंजन भट्टराय यांनी टाइम्स ऑफ इंडियासोबत संवाद साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, नेपाळला भारताकडून मदतीची अपेक्षा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ओलींनी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

ओली यांनी अशी इच्छा व्यक्त केली आहे की, भारताने या कठीण काळात ऑक्सिजन, आयसीयू बेड आणि व्हेन्टिलेटरचा पुरवठा करावा. ओली यांचे चीनसोबत पण चांगले संबंध राहिलेले आहेत.

चीन नेपाळला अशा वेळी औषधे आणि लसींचा पुरवठा करत आहे. मात्र कोरोनापासून बचावासाठी सर्वात मोठे उपयोगी साधन म्हणजे ऑक्सिजन आहे जे की त्यांच्याकडे सध्याच्या घडीला ते उपलब्ध नाही.

नेपाळमध्ये सध्याच्या घडीला ऑक्सिजन नसल्यामुळे तेथील नागरिकांची चिंता पण वाढली आहे. नेपाळमध्ये कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. दर रोज १५० ते २०० रुग्णांचा मृत्यू होत आहे. नेपाळला लवकरच भारतातून लसीचे आणखी डोस हलणार आहेत.

ताज्या बातम्या
मानलं बुवा; घरात जागा नसल्यामुळे पठ्ठ्याने झाडावर बसून काढला विलगीकरणाचा कालावधी

६ वर्षांपूर्वी विराट कोहलीने पाहिलेले ‘ते’ स्वप्न आज झाले पूर्ण, सर्व भारतीयांसाठी ठरला आनंदाचा क्षण

विनायक माळीचे व्हिडिओ व्हायरल होण्यामागच खर कारण आलं समोर; जाणून घ्या पुर्ण माहिती..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.