धक्कादायक! हाडे गोठणाऱ्या थंडीत झाली १०० किमी मॅरेथॉन; थंडीमुळे २१ स्पर्धकांचा मृत्यु

चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चीनच्या गांसू प्रांतामध्ये आयोजित करण्यात आलेल्या क्रॉस-कंट्री माऊंटन मॅरेथॉन दरम्यान मोठी दुर्घटना घडली असून या स्पर्धेत २१ स्पर्धकांचा मृत्यु झाला आहे.

हाडे गोठणाऱ्या थंडीत ही १०० किलोमीटरची मॅरेथऑन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा जिंगताई कौंटीमधील येलो रिव्हर स्टोन फॉरेस्ट टुरिस्ट साईटमध्ये आयोजित करण्यात आले होते. हिमवृष्टी, मुसळधार पाऊस आणि वादळात अडकल्याने २१ स्पर्धकांचा मृत्यु झाला आहे.

या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन गांसू येथे २३ मे रोजी करण्यात आले होते. कडाक्याच्या थंडीमुळे हायपोथर्मियाची शिकार होऊन स्पर्धकांचा मृत्यु झाला आहे, असे मदत आणि बचाव कार्याचे पथकाने म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या मृत स्पर्धकांमध्ये चीनच्या धावपटुंची संख्या जास्त आहे. मृत झालेल्या धावपटुंमध्ये लिआंग जिंग आणि हुआंग गुआनजून यांचाही समावेश होता. हे दोघे पण चीनचे आघाडीचे मॅरेथॉन धावपटू होते.

गांसू येथे ही या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात २०१८ मध्ये झाली होती. चिनी ऍथेलेटिक असोसिएशने या स्पर्धेला ब्राँझ मेडल इव्हेंट असे नाव दिली होते. ही स्पर्धा क्रॉस-कंट्री स्पर्धेतील सर्वात धोकादायक आणि कठिण स्पर्धा मानली जाते.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना समुद्र सपाटीपासून २००० मीटर उंचीवर आपली क्षमता दाखवावी लागते. धावपटूला २० तासांच्या आत हे १०० किलोमीटरचे आंतर पार करावे लागते. या शर्यतीत एकूण ९ चेकपॉईंट असतात, त्यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या चेक पॉईंटवर हा अपघात झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

४५ मधल्या २५ दिवस व्हेंटिलेटरवर असताना महिलेने केली कोरोनावर मात; डॉक्टरही झाले आश्चर्यचकित
अभिनेत्री प्रत्युषाच्या मृत्यूनंतर ५ वर्षांनी विकास गुप्ताने केला मोठा खुलासा; म्हणाला, मी तिच्यासोबत..
बाबो! नवरदेव नवरीच्या हाताने मिठाई खाताना करत होता नाटकं; संतापलेल्या नवरीने पहा मग काय केले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.