Share

‘चीन वैज्ञानिक प्रगती करतोय अन् आपण मंदिर, मशिदींवर वेळ घालवतोय’; नौदलप्रमुखांचा इशारा

सध्या देशातील धार्मिक वातावरण चिघळले आहे. रामनवमी उत्सवात दोन समाजाच्या गटांमध्ये हिंसाचार झाल्याचा अनेक घटना देखील समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये सार्वजनिक मालमत्तेची मोठा प्रमाणात हानी झाली आहे. महाराष्ट्रात देखील मशिदींवर असलेल्या भोंग्यांवरून वातावरण तापलं आहे. दुसरीकडे देशातील राजकीय नेत्यांकडून जागतिक स्पर्धेत अमेरिका आणि चीनची(China) बरोबरी करण्याची वक्तव्ये केली जात आहेत.(‘China is making scientific progress and we are spending time on temples and mosques’; Naval chief warning)

काही दिवसांपूर्वी देशातील धार्मिक वादावर आणि चीन बरोबर असणाऱ्या स्पर्धेसंदर्भात माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश यांनी मत व्यक्त केलं होतं. “आर्टिफिशिल इंटेलिजन्स रोबोटिक्स सारख्या क्षेत्रांमध्ये चीननं मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आपण मंदिर, मशिदीच्या गोष्टी करत राहिल्यानं केवळ वेळ फुकट जाईल. धर्म जातपात विसरून एक देश म्हणून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे”, असे माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश म्हणाले होते.

नवी दिल्लीतील प्रेम स्मृती व्याख्यानमालेत माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं होतं. यावेळी माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश म्हणाले की, “स्वातंत्र्यानंतर आपण विविध भेदाभेदांमध्ये अडकवून पडलो. कधी धार्मिक, कधी भाषिक तर कधी जातीपातीचे वाद समोर येत गेले. यात आपली बरीच ऊर्जा खर्च झाली”, असे माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश यांनी सांगितले होते.

माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश पुढे म्हणाले की, “देशाला मागे नेणारे वाद वारंवार उकरून काढण्याची नव्हे, तर कायमस्वरूपी संपवण्याची आवश्यकता आहे. चीनमध्ये सध्या आर्टिफिशिल इंटेलिजन्स ( कृत्रिम बुद्धिमत्ता ), रोबोटिक्स आणि मशीन लर्निंगची चर्चा सुरु आहे. त्या दृष्टीने संशोधनदेखील केलं जात आहे. अशा परिस्थितीत आपण जर मंदिर आणि मशिदीवर बोलणार असू तर त्या केवळ निरर्थक गप्पा ठरतील.”

“देशात सीमावर्ती भागांमध्ये शांतता प्रस्थापित होण्याआधी देशात शांतता निर्माण होणं जास्त गरजेचं आहे. आपण चीनचं आव्हान समोर ठेऊन तयारी करायला हवी. चीनला आता एकही गोळी झाडण्याची गरज नाही. कात्रण भारताला घायाळ करण्याचे अनेक मार्ग त्यांच्याकडे उपल्बध आहेत. त्यामुळे आता चीनचं आव्हान मोडून काढण्याच्या उद्देशाने आपण सज्ज व्हायला हवं”, असे माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश म्हणाले होते.

२००४ ते २००६ या दोन वर्षांच्या कालावधीत अरुण प्रकाश हे देशाचे नौदलप्रमुख होते. देशांतर्गत सुरक्षा जास्त महत्वाची आहे, असं मत माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश यांनी या व्याख्यानमालेत नोंदवलं होतं. सध्याच्या देशातील परिस्थितीत लक्षात घेता माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश यांनी केलेल्या वक्तव्याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
IPL मधील ‘या’ गोष्टीवर दिनेश कार्तिकने उपस्थित केले प्रश्न, म्हणाला, ‘हा’ तर सगळ्यात मोठा मुर्खपणा
राज ठाकरेंचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल; म्हणाले, ‘ज्या मुंब्य्रात अतिरेकी सापडलेत…’
…त्यावेळी ऐश्वर्याने भर सभेत काहीही विचार न करता केली होती जया बच्चन यांची मदत, लोकं म्हणाले होते..

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now