चिनी ॲप्सवर घातलेली बंदी म्हणजे डिजिटल स्ट्राइकच – केंद्रीय मंत्र्याचा दावा

 

नवी दिल्ली | आम्ही देशातील लोकांचा डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी चिनी ॲप्सवर बंदी घातली. हा एकप्रकारचा डिजिटल हल्ला असल्याचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.

गुरुवारी पश्चिम बंगालमध्ये घेण्यात आलेल्या भाजप रॅलीत रविशंकर प्रसाद बोलत होते. भारत-चीन सीमा वादावर बोलताना भारताला शांतता हवी असून जर कोणी वाईट नजर टाकली तर त्याला भारत सडेतोड उत्तर देणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

भारताच्या सीमांवर लक्ष ठेवणाऱ्यांच्या डोळ्यांशी डोळे कसे मिळवायचे हे भारताला चांगल्याप्रकारे माहित असल्याचेही रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

भारत-चीन सीमेवर गलवान घाटीत चीनी सैनिकांकडून भारतीय सैन्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे ५९ चिनी ॲप्स वर सरकारने बंदी घातली आहे.

या निषेध यामुळे चिनी सरकारला एक संदेश जावा की भारत ही आता शांत बसणार नाही यामुळे चीनी ॲप्सवर बंदी घातल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.