श्रीलंकेने कर्जापायी चीनला दिली जमीन; भारतासमोर उभे ठाकणार ‘हे’ मोठे संकट

श्रीलंका देश हा सध्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. जगभरातील वेगवेगळ्या देशांकडून घेतलेल्या कर्जामुळे श्रीलंकेचे आर्थिकचक्र बिघडत चालले आहे. त्यामुळे तिथे आर्थिक आणाबाणी लागू करण्यात आली आहे. तिथे अन्नधान्याच्या किंमतीत आणखी वाढ झाली आहे.

श्रीलंका वारंवार आर्थिक अडचणींमुळे चीनकडून कर्ज घेत आहे. अशा परिस्थितीत श्रीलंका चीनची वसाहत बनण्याचा धोका वाढत आहे आणि ही भारतासाठीही चिंतेची बाब असून पुढे भारतासमोर आणखी एक संकट उभे राहण्याची शक्यता आहे.

श्रीलंकेचा परकीय चलन साठा २०१९ मध्ये ७.५ अब्ज डॉलर्सवरून या वर्षी जुलैमध्ये २.८ अब्ज डॉलरवर आला आहे. परकीय चलनाच्या कमतरतेमुळे श्रीलंकेला परदेशातून वस्तू आयात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे द्यावे लागतात. त्यामुळे आतापर्यंत श्रीलंका रुपयाचे मूल्य सुमारे ८ टक्क्यांनी घसरले आहे. श्रीलंकेत खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात आयात केले जातात, त्यामुळे रुपयाच्या घसरणीमुळे अन्नधान्याच्या किमतीत वाढ दिसून येत आहे.

श्रीलंकेवर जगभरातील देशांचे एकूण ५५ अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. अहवालानुसार ही रक्कम श्रीलंकेच्या एकूण जीडीपीच्या ८० टक्के आहे. यामध्ये जास्तीत जास्त कर्ज चीनचे आणि आशियाई डेव्हलपमेंट बँकेचे आहे.

वारंवार चीनकडून घेत असलेल्या कर्जामुळे राजपक्षे यांच्या कार्यकाळात श्रीलंका आणि चीनमधील जवळीक वाढली. श्रीलंकेने विकासाच्या नावावर चीनकडून बरेच कर्ज घेतले. पण, जेव्हा ते पैसे देण्याची वेळ आली तेव्हा श्रीलंकेकडे काहीच शिल्लक नाहीये.

त्यामुळे श्रीलंकेला हंबनटोटा बंदर आणि १५ हजार एकर जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी चीनला द्यावी लागली. आता अशी भीती आहे की चीन हिंद महासागरात आपले उपक्रम चालू ठेवण्यासाठी नौदल तळ म्हणून देखील त्याचा वापर करू शकतो.

महत्वाच्या बातम्या-

संजीव कपूर यांना सुरूवातील शेफ बनायचे नव्हते, त्यांच्या या एका चुकीमुळे ते आज घराघरात झाले फेमस
गणपतीसाठी’मोदक’ बनवण्याची आगळीवेगळी पद्धत; अशाप्रकारे बनवा लाजवाब मोदक..
भयावह! वनप्लसच्या फोनचा खिशातच झाला बॉम्बसारखा स्फोट; ग्राहकाच्या उडाल्या चिंधड्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.