‘या’ अभिनेत्याच्या घरी गणेश चतुर्थी दिवशी झालं चिमुकलीच आगमन; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

मुंबई। छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता शाहिर शेख आणि रुचिका कपूर यांच्या घरी चिमुरडीचं आगमन झालं आहे. शाहिर आणि रुचिरा हे आईबाबा झाले आहेत. रुचिराने एका गोंडस कन्येला जन्म दिला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या मुलीचा जन्म बापाच्या आगमनादिवशी म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी झाला आहे.

काही आठवड्यांपूर्वी शाहीरची पत्नी रुचिकाच्या बेबी शॉवरचा विधी पार पाडला होता आणि त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाली होती. आता चाहते नव्यानेच पालक बनलेल्या रुचिका आणि शाहीर यांना या गुड न्यूजबद्दल शुभेच्छा देत आहेत.

कन्येला जन्म दिल्यानंतर आता आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याचे सांगितले जात आहे. शाहिरच्या चाहत्यांना ही बातमी समजताच त्यांनी शाहिर आणि रुचिका वर अभिनंदनाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. जून २०२१ मध्ये रुचिका कपूर तिच्या बेबी बंपला फ्लॉन्ट करताना दिसली होती. हे पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्याचे अभिनंदन केले होते.

रुचिका कपूरने त्या फोटोंमध्ये गुलाबी रंगाच्या लांब ड्रेसमध्ये तिचा बेबी बंपला फ्लॉन्ट करताना दिसली, तर शाहीर ग्रे कलरच्या टी-शर्टमध्ये दिसला. क्रिस्टल डिसूझा, रिद्धी डोगरा, तनुश्री दासगुप्ता आणि इतरांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दोघांनी को’र्ट मॅरेज शाहीर आणि रुचिकाच्या लग्नाच्या बातम्या आल्या होत्या.

कोर्ट मॅरेजनंतर हे जोडपे अभिनेत्याच्या पालकांचा आशीर्वाद घेण्यासाठी जम्मूला पोहोचले होते, त्यानंतर त्यांनी मुंबईत छोटे रिसेप्शनही ठेवले होते. जून महिन्यात प्रथमच, चाहत्यांना रुचिकाच्या गर्भधारणेबद्दल समजले. एकामुलाखती दरम्यान शाहीर म्हणाला होता की, तो लग्नानंतर मोठे रिसेप्शन देणार होता, पण कोरोनामुळे त्याला ते पुढे ढकलावे लागले.

शाहीर म्हणाला, ‘याकाळात मी माझे दोन जवळचे नातेवाईक गमावले आहेत. शाहिरला फार दिखावेदार विवाह सोहळा नको होता. त्याला आपले लग्न साधेपणाने करायचे होते. लेकीच्या येण्याने आता शाहीरचे कुटुंबही पूर्ण झाले आहे.

शाहिरच्या कामाबद्दल बोलायचे झालेच तर शाहीर ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘महाभारत’ आणि ‘ये रिश्ते है प्यार के’ सारख्या शोमध्ये दिसला आहे. व आता पवित्र रिश्ता या मालिकेत मानवाच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहिरची पत्नी रुचिका कपूर ‘बालाजी मोशन पिक्चर्स लिमिटेड’ ची सिनियर व्हाईस प्रेसिडेन्ट आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे.
महत्वाच्या बातम्या
जेव्हा सत्तरीच्या आजीने धरला ठेका तेव्हा सर्वच झाले चकित, ‘वल्लव रे नखवा’ गाण्यावर लावले ठुमके; पहाच एकदा..
संजय राऊतांसारख्या तालिबानी प्रवृत्तीच्या तुम्ही मुसक्या कधी आवळणार?, चित्रा वाघ यांचा रश्मी ठाकरेंना सवाल 
‘या’ वृत्तपत्राच्या एका चुकीमुळे राजकारणात माजला हाहाकार; असे होऊ लागले आरोप-प्रत्यारोप… 
लंकेचा चोरीचा वाळूचा ट्रक पकडणाऱ्या तहसिलदार देवरेंची अखेर बदली; निलेश लंकेंसोबत झालता वाद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.