बॅण्ड पथकात लावणी म्हणणाऱ्या चिमुकलीने सोशल मिडियावर घातला धुमाकूळ; पाहा व्हिडिओ

सोशल मिडिया एक असं माध्यम झालं आहे की त्यावर व्हिडिओ, फोटो शेअर करत अनेकजण रातोरात स्टार झाले आहेत. काही असे अॅप देखील आहेत ज्यावर आपल्या अंगातील कला दाखवून आपण प्रसिध्दी मिळवू शकतो.

सोशल मिडियावर काही आनंददायी व्हिडिओ असतात. तर काही दु:खद व्हिडिओ असतात. पण काही व्हिडिओ असे असतात की एकच व्हिडिओ आपल्याला अनेकवेळा पाहू वाटतो. तसेच व्हिडिओमधील व्यक्तीच्या कलेचे कौतूक करू वाटते.

सोशल मिडियावर सध्या असाच एक व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. एक लहान मुलगी बॅण्ड पथकामध्ये सुरेल आवाजात ‘ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर’ ही लावणी गात आहे. तिच्या आवाजाने अनेकांनी तिच्या कलेला दाद दिली आहे.

व्हिडिओमध्ये पाहू शकता, बॅण्ड पथकात वाद्य वाजवणाऱ्या मुलांच्या बरोबरीने ही लहान मुलगी गोड आवाजात देवता चित्रपटातील ढोलकीच्या तालावर ही लावणी गात आहे. मुलगी गात असलेल्या बॅण्ड पथकाचं नाव संगम बॅण्ड असल्याचं दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा गावचा हा बॅण्ड आहे.

काटे आणि देवरे या परिवाराच्या विवाह सोहळ्यात हे बॅण्ड पथक आपल्या अंगातील कला दाखवत आहेत. पण सर्वांपेक्षा या मुलीनेचं सर्वांचे मन जिंकले आहे. सोशल मिडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.

शहरामध्ये विवाह सोहळ्यात मोठ्या आवाजात डीजे लावले जातात. तर कार्यक्रमांमध्ये आर्केस्ट्राचं आयोजन केलं जातं. मात्र ग्रामीण भागात लग्नाची शोभा वाढवण्यासाठी आजूनही बॅण्ड पथकांना बोलावले जाते.

प्रत्येक गावागावामध्ये बॅण्ड पथकं पाहायला मिळतात. बॅण्ड पथकांसोबत लग्नाची वरात काढली जाते. काही ठिकाणी वरातीत तरूण गाणं म्हणताना दिसतात. मात्र या लहान मुलीने सर्वांनाच टक्कर दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
सोलापुरच्या त्या दीड कोटीच्या मोदी बकऱ्याचा मृत्यू; मालकाने स्वत:च्या मुलासारखा केला होता सांभाळ
दिग्दर्शकाने घेतला होता रिना रॉयच्या मजबूरीचा फायदा; द्यावा लागला सेमी न्यूड सीन
उन्हाळ्यात होणारा उष्माघात टाळण्यासाठी करून पहा ही घरघुती पद्धत

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.