“त्यादिवशी एका दिवसात १७ कोटी मुलांना पोलिओचा डॉस देण्यात आला, मात्र त्यावेळी पोस्टर्स नव्हते”

मुंबई । कोरोनाची दुसरी लाट अजूनही सक्रिय आहे.  यामुळे लसीकरण मोठ्या प्रमाणावर केले जात असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. यावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात २१ जूनपासून मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. त्यानुसार, देशात २१ जून रोजी देशात तब्बल ८० लाख लोकांचे रेकॉर्डब्रेक लसीकरण करण्यात आले आहे.

यामुळे मोदींनी ट्विरवरुन देशवासीयांचे अभिनंदन केले. त्यांनी ‘वेल डन इंडिया’ असे म्हटले. मात्र याबाबत एवढी जाहिरातबाजी का केली जातेय असेही सांगितले जात आहे. जाहिरातबाजी आणि बॅनरबाजीतून मोदी सरकारकडून स्वत:चे कौतुक होत आहे. त्यावरुन काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केली आहे.

याबाबत वर्तमानपत्रातून मोठ्या प्रमाणात जाहीरातबाजीही करण्यात आली आहे. त्यावरुनच, काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केली आहे. देशात यापूर्वीही मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले, पण कधी अशी चमकोगिरी केली नाही.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात एका दिवसात १७ कोटी मुलांना पोलिओचा डोस देण्यात आला होता. मात्र, त्यावेळी ना पोस्टर्स होते, ना मोठा प्रचार. कारण उद्देश जीव वाचवण्याचा होता, स्वत:ची प्रतिमा चमकावण्याचा नाही!, असे म्हणत काँग्रेसने मोदींच्या लसीकरणातील जाहीरातबाजीवर टीका केली आहे.

याबाबतचे ट्विट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेअर केले आहे. यामुळे आता भाजपकडून काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यापीठ आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी याबाबत विविध विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांना संदेश पाठवले आणि मोदींचे आभार व्यक्त करणारे फलक सोशल मीडियावरील शैक्षणिक संस्थांच्या वेबपेजवर प्रसिद्ध करावेत, असे सांगितले.

माहिती व प्रसारण मंत्रालयाचे मान्यताप्राप्त डिझाईन हे हिंदी आणि इंग्रजी भाषेतून उपलब्ध असेल आणि ते सोशल मीडियाला जोडावे. या डिझाईनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असून ‘धन्यवाद पीएम मोदी’ असा आशयही लिहिण्यात आला आहे. यामुळे हे प्रकरण तापले आहे.

ताज्या बातम्या

‘ही’ असू शकतात लहान मुलांमध्ये कोरोनाची सुरुवातीची लक्षणे, तज्ञांनी दिली महत्वाची माहिती

अजबंच! अवघ्या १३ महिन्यांच्या चिमुकलीच्या पोटात गर्भ; वाचा काय आहे प्रकरण…

भल्याभल्यांना नडणाऱ्या कंगणाबाबत ‘बजरंगी भाईजान’च्या ‘मुन्नी’ने केली ‘ही’ गोष्ट; पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.