लहान मुलांना कोरोना होण्याचे कारण काय? त्यांना कोरोनापासून कसे वाचवायचे? वाचा..

राज्यात पुन्हा एकदा कोरोना वेगाने पसरताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे हजारो रुग्ण समोर येत आहे, असे असताना मार्च महिन्यातील कोरोना संक्रमित झालेल्या मुलांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत मोठ्याप्रमाणात लहान आणि किशोरवयीन मुलांना कोरोना होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात २० वर्षांपर्यंतच्या मुलांचा आकडा जोडला तर हा आकडा ५५ हजार मुलांपेक्षा जास्त आहे. आता मुलांच्या कोरोना संक्रांमनावर प्रसिद्ध डॉ. तात्याराव लहाने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्यावर्षी आलेल्या कोरोनाच्या लाटेमध्ये जेष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण होत होती, आता या कोरोनाचे स्वरूप बदलले आहे. आधी हा विषाणू ३-४ लोकांना संक्रमित करायचा, पण आता हा विषाणू १०-१२ लोकांना संक्रमित करत आहे, असे डॉ. तात्याराव लहाने यांनी म्हटले आहे.

इमारतीच्या गार्डनमध्ये किंवा सोसायटीत लहान मुले एकत्र खेळताना दिसून येतात, लहान मुलं मास्क लावत नसल्यामुळे त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. पण यात चांगलीबाब म्हणजे लहान असणाऱ्या मुलांमधील कोरोना लवकर बरा होत आहे, असेही लहाने यांनी म्हटले आहे.

लहान मुलांची रोगप्रतिकारकशक्ती सक्षम असते, त्यांना कोरोना झाला तरी हा सौम्य स्वरूपाचा असतो. पण आजार होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे, असे लहाने यांनी म्हटले आहे.

या आजाराचे लक्षण दिसताच, आपण तपासणी करून घेतली पाहिजे. ज्या मुलांचे पालक बाहेर जातात, त्यांनी काळजी घेणे गरजेचे, जेवताना चहा पिताना सर्वांसोबत बसून खाण्यापेक्षा अंतर ठेवणे गरजेचे आहे, तसेच बाहेरून आल्यावर हात धुणे, स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे,अशी काळजीही डॉ. लहाने यांनी घेण्यास सांगितली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.