दोस्ती असावी तर अशी! चिमुकला जंगलात फिरायला गेला आणि नवीन मित्राला घेऊन आला

इंटरनेटवर रोज अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. त्यातल्या काही गोष्टी चांगल्या असतात तर काही वाईट. सध्या एका अशाच चार वर्षांच्या मुलाची एक गोष्ट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्याचे फोटोही सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

या व्हायरल फोटोमागचे कारण आहे या फोटोतील मुलाचा खास मित्र. तुम्हाला वाटेल की असे काय खास आहे या फोटोत? हा मित्र माणुस नाहीये तर एक प्राणी आहे. हा चिमुकला जंगलात जातो आणि एका हरणाला आपल्यासोबत घेऊन येतो.

स्टेफनी ब्राऊन आणि त्यांचे कुटुंबिय सहलीसाठी व्हर्नियामध्ये मासान्युटॅन रिसॉर्टमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांचा ४ वर्षांचा मुलगा डॉमनिक खेळायला जातो. तो रिसॉर्टच्या समोर असलेल्या झुडपामध्ये खेळत असतो.

मात्र काही वेळाने तो खेळून परत आला तर त्याच्यासोबत एक हरणाचे पिल्लू होते. हे रिसॉर्ट शेनॅनडोह राष्ट्रीय अभयारण्याच्या जवळ आहे. असा अंदाज वर्तवला जात आहे की हे हरिण त्याच अभयारण्यातून भटकत भटकत रिसॉर्टच्या जवळ आले असावे.

डॉमनिकची आई म्हणाली की, आम्ही जाण्याची तयारी करत होतो तेव्हा डॉमनिक बाहेर खेळायला गेला होता येताना तो एका हरणाच्या पिल्लाला घेऊन आला. आणि ते हरीण थेट दारापर्यंत आलं. माझ्या मुलाला एका छोट्या हरणासोबत पाहून मला काय जाणवले हे मी तुम्हाला शब्दांत सांगू शकत नाही.

मला विश्वासच बसत नाही. हा माझा भास आहे हे मला वाटत होते. असे स्टेफनी म्हणजे डॉमनिकची आई म्हणाली. स्टेफनी फ्रिजमधून खाण्याचे पदार्थ काढत होती तेव्हा तिला दरवाजाजवळ पावलांचे आवाज आले.

त्यावेळी त्यांनी मागे वळून पाहिले आणि त्यांनी पाहिले की त्यांचा ४ वर्षांचा मुलगा एका हरणाच्या पिल्लासोबत दरवाजात उभा आहे. विशेष म्हणजे हे हरीण एकदम निवांत त्यांच्या मुलासोबत उभे आहे. हे पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसला. पुढे काय करावे हेच मला सुचत नव्हते. असं स्टेफनी यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.