फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारे कलाकार खुप प्रसिद्ध असतात. कलाकार छोटा असो किंवा मोठा चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्यांना यश नक्कीच मिळते. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडमध्ये बालकलाकार म्हणून यश मिळवणाऱ्या बेबी गुड्डूबद्दल सांगणार आहोत.
७० आणि ८० च्या दशकात फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक बालकलाकार काम करत होते. पण जी प्रसिद्ध बेबी गुड्डूला मिळाली. ती प्रसिद्धी दुसऱ्या कोणत्याही बालकलाकाराला मिळाली नाही. बालकलाकार म्हणून बेबी गुड्डूने ३२ पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
बेबी गुड्डूचे खरे नाव शाहीदा बे होते. ती निर्माते एमएम बेची मुलगी होती. त्यामुळे अभिनय क्षेत्राशी तिचे नाते खुप जवळचे होते. वयाच्या तिसऱ्या वर्षी बेबी गुड्डूने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यानंतर तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
खुप कमी वयात बेबी गुड्डू प्रसिद्धी झोकात आली होती. बेबी गुड्डूने औलाद, समंदर, घर परिवार, घर घर की कहाणी, नगीना, मूलझीम, गुरू यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. ८० च्या दशकात बेबी गुड्डू खुप प्रसिद्ध होती.
८० च्या दशकातील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये बेबी गुड्डू नक्कीच दिसेल. तिने त्या काळातील सर्व सुपेरस्टार्स बरोबर काम केले आहे. त्यामुळे ती अनेक कलाकारांची आवडती होती. राजेश खन्ना बेबी गुड्डूचा खुप लाड करायचे.
बेबी गुड्डू मुलगी होती. पण तरीही अनेक चित्रपटांमध्ये तिने मुलाची भुमिका साकारली आहे. खुप कमी वयात ती अतिशय उत्तम अभिनय करत होती. म्हणून चित्रपटांमध्ये बालकलाकार बेबी गुड्डूलाच घेण्यात यायचे. ती मोठी झाल्यानंतर अभिनेत्री होईल असे सर्वांना वाटत होते. पण तसे झाले नाही.
त्यासोबतच श्रीदेवी, जया प्रदा, जितेंद्र हेमा मालिनी, मिथून चक्रवर्ती यांसारखे मोठे मोठे कलाकार बेबी गुड्डूचा लाड करायचे. त्यामुळे ती बॉलीवूडची सर्वात लाडकी बालकलाकार आहे. असे बोलता येऊ शकते.
८० च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या बेबी गुड्डूने लवकरच बॉलीवूड सोडले. १९९१ साली रिलीज झालेला घर परिवार चित्रपट बेबी गुड्डूचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर ती दुसऱ्या कोणत्याही चित्रपटांमध्ये दिसली नाही.
बेबी गुड्डूने तिच्या शिक्षणावर लक्ष देण्यास सुरुवात केली. तिने विदेशात जाऊन तिचे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर ती बॉलीवूडमध्ये अभिनेत्री म्हणून डेब्यु करू शकली असती. पण तिने अभिनय क्षेत्रापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला.
बेबी गुड्डूचे वडील निर्माते होते. पण तरीही ती अभिनय क्षेत्रात आली नाही. तिने अभिनयापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तिने काही दिवस काम केले. त्यानंतर तिने लग्न केले.
आज बेबी गुड्डू दुबईत आहे. तिने लग्न केले आहे आणि तिला मुलं देखील आहेत. पण आजही बेबी गुड्डू तिचे बॉलीवूडमधले बालपण विसरू शकली नाही. लोक आज देखील बेबी गुड्डूची आठवण काढतात.
महत्त्वाच्या बातम्या –
बाॅलीवूड पुन्हा हादरले! चित्रपट निर्मात्याच्या घरावर एनसीबीचा छापा; सहा किलो ड्र.ग्ज जप्त
सनी देओलचे करिअर फ्लॉप करायला निघालेले महेश भट्ट स्वतःचे करोडोचे नुकसान करून बसले
रेखाने विनोद मेहरासोबत गुपचूप लग्न केले होते का? वाचा खरं काय..
ब्लॅक चित्रपटासाठी अमिताभ बच्चनने फुकट काम केले होते; कारण ऐकल्यावर अभिमान वाटेल