पुण्यातला तरुण शेवग्याच्या पानांपासून चिक्की, चॉकलेट, विकून कमवतोय लाखो रुपये, जाणून घ्या..

पुणे । शेतकरी आपले व्यवसाय वाढवण्यासाठी नवनवीन उपाय करत असतात. आपले उत्पन्न वाढवण्यासाठी ते अनेक प्रयत्न करत असतात. शेती शिवाय देखील ते अनेक नवीन व्यवसाय करत असतात. अशाच प्रकारे मार्केटमधील मागणी, अभ्यास आणि दर्जेदार उत्पादनावर भर या त्रिसूत्रीनुसार काम करत पुण्यातल्या प्रमोद पानसरे यांनी फूड इंडस्ट्रीमध्ये चांगली भरारी घेतली आहे.

शेवग्याच्या पानापासून प्रथम पावडर नंतर चॉकलेट, स्नॅक्स यांसारखे पदार्थ तयार करून, त्यांची विक्री करून ते आता महिन्याला तीन लाख रुपयांचा व्यवसाय करत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असल्याने मागील काही वर्षांपासून शेवग्याला मागणी वाढत आहे. तर आपण जाणून घेऊयात प्रमोद पानसरे यांनी शेवग्याच्या पानांपासून चॉकलेट, चिक्की, खाकरा आणि स्नॅक्स तयार करण्याच्या उद्योग कशाप्रकारे सुरू केला.

३० वर्षाचा प्रमोद हा एक सर्वसामान्य कुटूंबातला आहे. शेती हा त्यांच्या कुटूंबाचे उदरनिर्वाह साधन होते. २०२१ मध्ये त्याने फूड टेक्नोलॉजीमध्ये बी. टेक केले. एका फूड कंपनीत नोकरी करू लागले. तिथे तीन वर्षं काम करताना वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती प्रक्रिया त्यांनी जाणून घेतली. प्रमोद म्हणाला, शेवगा हा आरोग्यासाठी उपयुक्त असतो हे मला माहिती होते.

मात्र त्यावर प्रक्रिया करण्याची माहिती मला नोकरीत असताना मिळाली. त्यानुसार शेवग्याच्या शेंगा आणि पानांपासून मी पावडरनिर्मिती सुरू केली. शेवग्याच्या शेंगा आणि पानांपासून चिक्की बनवण्याचा व्यवसाय अभ्यास करून डिसेंबर २०१८ मध्ये सुरू केला. पहिल्या टप्प्यात ते स्वतः स्टॉल लावून चिक्की विक्री करत. तसेच त्यांनी या उत्पादनांची किंमत कमी ठेवली होती. त्यामुळे ग्राहकांकडून हळूहळू मागणी वाढत गेली.

काही काळानंतर मला एक गुंतवणूकदार भेटला. त्याने या व्यवसायात १५ लाखांची गुंतवणूक केली आणि पुण्यात ऑफिस सुरू केले. त्यानंतर कंपनी रजिस्टर्ड केली. काही महिने काम उत्तम चालले. प्रमोदने सांगितले, माझ्यासोबत १५ कामगार काम करतात. त्यात महिलांची संख्या जास्त आहे. आम्ही दररोज २ टन चॉकलेट आणि चिक्की तयार करतो. खाकरा उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते.

मागच्या महिन्यात आमची उत्पादने श्रीलंकेतही गेली आहेत. तसेच ॲमेझॉन आणि इंडिया मार्टवरही आमची उत्पाने उपलब्ध आहेत. चॉकलेट खाणे लहान मुलांसाठी अपायकारक मानले जाते. या पार्श्वभूमीवर होममेड आणि ऑरगॅनिक चॉकलेटला मागणी वाढली आहे. प्रमोद यांनी अनेक तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

ताज्या बातम्या

अभिनेत्रींनापण लाजवेल असा ‘या’ भारतीय महिला क्रिकेटरचा लूक, चाहते घायाळ

एकेकाळी खुप गरीब होते अनिल कपूर; अनेक दिवस राज कपूरच्या गॅरेजमध्ये राहत होते अनिल कपूरचे सगळे कुटूंब

VIDEO: धक्कादायक! अभिनेत्री लाईव्ह परर्फोमंस करत असताना अचानक ३० लांडग्यांनी केला हल्ला अन्…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.