सचिन वाझेंच्या अटकेनंतर शरद पवारांचे मोठे विधान, म्हणतात…

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. याचबरोबर एनआयएने सांगितल्यानुसार, सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम २८६, ४६५, ४७३, ५०६(२), १२०बी आणि ४ (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम १९०८ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

यावरून आता राजकारण तापायला सुरुवात झाली असून वाझे यांना अटक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘मी काही सांगू शकत नाही’ अशी मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पियो सापडली होती. याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने सचिन वाझे यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.

एनअयाकडून सचिन वाझे यांची शनिवारी दिवसभर चौकशी केली. यानंतर रात्री उशीरा ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत एनाआयच्या अधिकाऱ्यांने अधिकृत माहिती दिली आहे.

वाझे यांना अटक केल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. राज्य सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. एएनआयने वाझे यांना अटक केल्यानंतर हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

१५ वर्ष जुन्या गाड्या आता थेट जाणार भंगारात, जाणून घ्या नवीन नियम

काय बोलावे! अभिनेते राजकूमार यांनी त्यांच्या कुत्र्याला विचारुन हिट चित्रपटाला नाकारले होते

भारत सामना हारला ही गोष्ट सहन झाली नाही; म्हणून अभिनेत्याने गमावला होता जीव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.