पाच वर्षे शिवसेनेकडेच मुख्यमंत्रीपद राहणार कारण…, संजय राऊत यांचा विश्वास

मुंबई । अनेक प्रयत्न करून तीन पक्षांचे सरकार एकत्र करून महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आले आहे. आणि सरकार स्थापन झाल्यावर अनेकजण असे दावे करत होते, की हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, पाच वर्षे मुख्यमंत्री पद हे शिवसेनेकडे राहणार का?, असा सवाल आता उपस्थिती केला जात आहे.

यावर भाष्य करताना मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडे पाच वर्ष पू्र्ण राहणार आहे. यामध्ये कोणतीही वाटाघाट नाही, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हा एकमुखाने हा निर्णय घेण्यात आला होता. तोच कायम राहणार आहे, असे पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या भाषणात हेच म्हटले आहे. आमच्या कुणाच्या मनात अशी शंका नाही. फक्त प्रसारमाध्यमांमध्ये याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून वक्तव्य केले, असे राऊत यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीमध्ये कोणतीही नाराजी नाही. काँग्रेसमध्ये नाराजी नाही.

तिन्ही पक्ष एकत्र आले आणि सरकार स्थापन केले. तिन्ही पक्षांना आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. काँग्रेस पक्षातच नाही तर अनेक पक्षात दावेदार आहे. मुख्यमंत्रिपदाची इच्छा असणं गैर नाही. ३ स्वतंत्र विचारधारेचे पक्ष आहे, असेही राऊत म्हणाले आहे. मी कार्यकर्त्यांना केलेल्या भाषणाचा व्हिडीओ कुणी तरी बाहेर काढले. मी स्वाभिमानाने राहिले पाहिजे, असे विधान केले होते.

भाजपसोबत युती केली तेव्हा सेनेला वागणूक दिली जात होती, त्याबद्दल मी बोललो आहे. आज राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. आम्ही स्वाभिमानाने सत्तेत आहोत. त्यामुळे आम्हाला दिल्लीला जायचे असेल तर मुख्यमंत्री म्हणून जातोय. यात गुलामगिरीचा प्रश्नच येत नाही. स्वाभिमानाचे दुसरे नाव हे शिवसेनाप्रमुख आहे. हे समजून घ्या, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

अमिताभ बच्चनला धडा शिकवण्यासाठी राजीव गांधींनी राजेश खन्नाची घेतली होती मदत

मोठा खुलासा! खासदार-अभिनेत्री नुसरत जहाँचे लग्नापूर्वी होते ‘या’ आरोपीसोबत प्रेमसंबंध

बापरे! एका ट्रान्जेक्शनसाठी बँक तुमच्याकडून तब्बल ‘इतके’ रुपये आकारते; जाणून घ्या हे पैसे कसे वाचवता येईल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.