Share

“तुम्ही मला फक्त वज्रमूठ द्या…दात पडायचं काम मी करून दाखवतो”, टीझरमधून मुख्यमंत्र्यांचे शिवसैनिकांना आवाहन

शिवसेनेची येत्या १४ तारखेला मुंबईत जाहीर सभा होणार आहे. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thakare) भाषण करणार आहेत. नुकताच या सभेचा तिसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. “तुम्ही मला फक्त वज्रमूठ द्या…दात पडायचं काम मी करून दाखवतो”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाजातील वाक्य या टीझरमध्ये ऐकू येत आहे.(Chief Minister’s appeal to Shiv Sainiks from teaser)

हा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी शिवसेनेच्या या सभेचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.”माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. १४ तारखेला मी अनेकांचे मास्क काढणार आहे”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सभेच्या संदर्भात बोलताना म्हणाले होते. त्यामुळे या शिवसेनेच्या या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली होती. या सभेतून राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र देखील लिहिले होते. या पत्रातून राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १४ तारखेला होणाऱ्या शिवसेनेच्या सभेत या टीकेला उत्तर देणार असल्याची माहिती मिळत आहे. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपवर देखील निशाणा साधणार असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचा दुसरा टीझर प्रदर्शित केला होता. हा टीझरही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या टीझरवरून मनसेने शिवसेनेवर निशाणा साधला होता. शिवसेनेच्या टीझरमध्ये मनसेच्या सभेची दृश्य वापरण्यात आली आहेत, असा आरोप मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी केला होता.

मनसेचे नगरसेवक चोरता चोरता शिवसेना फोटो देखील चोरू लागली, असा खोचक टोला मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी लगावला होता. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचा टीझर ट्विटरवर शेअर केला होता. तसेच शिवसेनेवर टीका देखील केली होती. यावर शिवसेनेकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या :-
“दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीत एकी नाही”, प्रसाद ओकने व्यक्त केली खंत
शरद पवारांनी आतापर्यंत ५ वेळा माफी मागितली असती; राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या युपीतील खासदाराचे वक्तव्य
पुणेकरांनो सावधान! पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने खळबळ; वाचा नेमकं घडलं काय?

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now