राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. सर्वच राजकीय पक्ष विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी करत आहेत. भाजप पक्षाकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवार देण्यात आले आहेत. संख्याबळ कमी असताना देखील भाजपने पाचवा उमेदवार उभा केला आहे.(Chief Minister Uddhav Thackeray’s big decision)
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक अतिशय रंगतदार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यादरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची जास्तीची मते काँग्रेस उमेदवारांना देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री एक वाजता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना फोन करून यासंदर्भातील माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेची ४ ते ५ अधिकची मते कोणाला देण्यात येणार याबाबत पक्षाकडून काहीही स्पष्ट करण्यात आले नव्हते.
पण मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेची अधिकची मते काँग्रेस उमेदवाराला दिली जाणार आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजयी होण्यासाठी शिवसेनेच्या दोन उमेदवारांना प्रत्येकी २६ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष उमेदवारांची मते काँग्रेसला दिली जाणार आहेत.
राज्यसभेच्या निवडणुकीत पराभव स्विकारावा लागल्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून सावध भूमिका घेतली जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या कोणत्याही उमेदवाराचा पराभव होऊ नये म्हणून नेत्यांकडून चोख रणनिती आखली जात आहे. काल मध्यरात्रीपर्यंत महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्वाची बैठक सुरु होती.
या बैठकीत शिवसेनेचे नेते अरविंद सावंत, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या बैठकीत शिवसेनेकडे असलेली अतिरिक्त मते काँग्रेस उमेवाराला देण्यासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. अखेर काँग्रेसला शिवसेनेची मनधरणी करण्यात यश आले आहे. शिवसेनेची अतिरिक्त मते मिळाल्यामुळे काँग्रेस उमेदवाराला फायदा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
यावेळी तुम्हाला मला मतदान करावंच लागेल नाहीतर…, खडसेंचे भाजप आमदारांना साकडे
‘..त्यामुळं बायकोला मारून टाकलं, मृतदेह घरात पडून आहे’, नवऱ्याचं पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पन
अग्निपथ योजना बंद होणार नाही, आंदोलक अग्निवीर होणार नाहीत, डिफेंस अधिकारी आपल्या मतावर ठाम