Share

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सापडले अडचणीत; ‘या’ प्रकरणी हरीयाणा पोलीसांत तक्रार दाखल

काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा(Ravi Rana) यांच्यावर दोन गटांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी मुंबईतील खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणात कारवाई करत राणा दाम्पत्याला अटक देखील केली होती. याप्रकरणी राणा दाम्पत्याला न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.(Chief Minister Uddhav Thackeray found in trouble; Filed a complaint with Haryana Police in this case)

या प्रकरणावरून थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हरियाणातील अंबाला पोलीस ठाण्यात सामाजिक कार्यकर्ते विरेश शांडिलीये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. राणा दाम्पत्याच्या प्रकरणात आपल्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे म्हणत विरेश शांडिलीये यांनी अंबाला पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

या तक्रारीवर अद्याप अंबाला पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणासाठी मुंबईत दाखल झाले होते. यावेळी शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याचा जोरदार विरोध केला होता.

शिवसैनिक राणा दाम्पत्य राहत असलेल्या खार येथील घरासमोर ठाण मांडून बसले होते. तसेच काही शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री घरासमोर दाखल झाले होते. अगदी ९२ वर्षांच्या आज्जी देखील पहारा देण्यासाठी मातोश्रीवर आल्या होत्या. यानंतर आक्रमक शिवसैनिकांसमोर राणा दाम्पत्याने माघार घेतली होती.

त्यानंतर मुंबई पोलिसांकडून राणा दाम्पत्याला अटक देखील झाली आहे. राणा दाम्पत्य सध्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. मुंबई पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात राणा दाम्पत्याने गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती.

राणा दाम्पत्याने यासंदर्भात एक याचिका देखील मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. पण गुन्हा रद्द करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढल्या आहेत. तुरुंगात मिळणाऱ्या वागणुकीवरून खासदार नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवर आणि राज्य सरकारवर देखील गंभीर आरोप केले होते.

महत्वाच्या बातम्या :-
अजब गजब लव्हस्टोरी! अखेर विशालला कुसुमचा मेसेज मिळाला, १० रुपयांची नोट पुन्हा व्हायरल
देशमुखांवर झालेले १०० कोटींचे आरोप खोटे, चांदीवाल आयोगाच्या चौकशीतून धक्कादायक माहिती आली समोर
‘त्या’ कारमध्ये मोदी असते तरीही ती फोडलीच असती; अभिनेत्री दीपाली सय्यदकडून हल्ल्याचं समर्थन

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now