विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. . या निवडणुकीत शिवसेनेची काही मते फुटल्याचे देखील समोर आले आहे. यादरम्यान शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) पक्षावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.9chief minister statement in shivsena event eknath shinde take personaly?)
शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे काल संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे १३ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. आईचे दूध विकणारा नराधाम मला शिवसेनेत नकोय, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनी केलं होतं.
या वक्तव्याचे सध्या सूचक अर्थ काढले जात आहेत. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मतांची फोडाफोडी आणि शिवसेनेसोबत गद्दारी या विषयांवर भाष्य केलं होतं. यावेळी कार्यक्रमात व्यासपीठावर शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे देखील हजर होते.
शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, “गेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचं एकही मत फुटलेलं नाही. एकही नाही. मत फुटलं कोणतं… त्याचा सुद्धा अंदाज लागलेला आहे. कुणी काय कलाकाऱ्या केल्या, त्याचाही उलगडा झालेला आहे. त्यामुळे मला फाटाफुटीची शक्यता बिलकुल वाटत नाही.”
“शिवसेनेत आता गद्दारकुणीही राहीला नाही. कितीही फाटलं तरी शिवसेनेने इतिहासाला दाखवलेले आहे. अशीच एकदा मागे फाटाफूट झाली होती. त्यावेळी शिवसेना प्रमुख म्हणाले होते की, आईचे दूध विकणारा नराधाम मला नको. तो आज काय उद्या सुद्धा मला नकोय”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यक्रमात म्हणाले होते.
या वक्तव्याची सध्या चर्चा होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची कारणे सध्या समोर येत आहेत. मंत्रिपद असूनही मनासारखे काम करता येत नाही. निर्णय घेता येत नाहीत. यामुळे एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून नाराज होते, असे सांगितले जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीची जबाबदारी देताना एकनाथ शिंदे यांना पक्षाकडून डावलण्यात आलं होतं, यावरूनही एकनाथ शिंदे पक्षावर नाराज होते.
महत्वाच्या बातम्या :-
एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिला प्रस्ताव, केल्या ‘या’ तीन महत्वाच्या मागण्या
चुकीला माफी नाही! एकनाथ शिंदेंना पहिला ‘ठाकरी’ झटका ! शिवसेनेच्या गटनेतेपदावरून उचलबांगडी
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेसमोर ठेवली ‘ही’ मोठी अट; म्हणाले, चर्चा करणार पण त्यासाठी…