‘मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या सूचनांचे पालन करावे; देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका’

 

मुंबई | सध्या महाविकास आघाडीत कोरोना आणि लॉकडाऊनच्या प्रश्नावरून नाराजी नाट्य सुरू आहे. यावरून विरोधी पक्षही राज्य सरकारवर टीका करत आहे.

आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या सूचनांचे पालन करावे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात शरद पवार आणि माझी अनेकदा भेट व्हायची, पवार साहेब मला काही सूचना करायचे त्या सूचनांचे पालन मी करायचो, असे फडणवीस म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मला माहित नाही. पण शरद पवार जेष्ठ नेते आहे. त्यांना राज्याचा प्रदीर्घ अनुभव आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या सूचना एकूण त्या अंमलात आणाव्यात असे फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांमध्ये ठाकरे पवार भेट होत आहे. कधी बाळासाहेब ठाकरे स्मारकात तर कधी मातोश्रीवर या भेटीने नेहमीच उलट-सुलट चर्चा होत असतात.

त्यामुळे अनेक बैठकांनंतरही महाविकास आघाडीत फारसे चांगले नसल्याचे दिसत आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.