पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना पिकअपने धडक दिली होती. या अपघातात १४ वारकरी जखमी झाले होते. मिरज- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला होता. या अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी या अपघाताची तातडीने दखल घेतली होती.(Chief Minister Shinde made a video call to the injured Warkari)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टरांना फोन करून जखमी वारकऱ्यांवर तातडीने उपचार करण्यास सांगितले होते. तसेच गरज पडल्यास जखमी वारकऱ्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या व्यस्त कामकाजातून वेळ काढत जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली आहे.
https://twitter.com/9TQQOHcUtFl6tSE/status/1545042573093654534?s=08
खानापूर-आटपाडी मतदार संघाचे आमदार अनिल बाबर हे जखमी वारकऱ्यांना भेटण्यासाठी शासकीय रुग्णालयात गेले होते. यावेळी आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हिडिओ केला आणि जखमी वारकऱ्यांशी संवाद साधून दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जखमी वारकऱ्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
https://twitter.com/9TQQOHcUtFl6tSE/status/1545042649841025024?s=08
“तब्येत कशी आहे तुमची? माझं डॉक्टरांच्या सोबत बोलणं झालं आहे. ते सगळं पाहतील. तुम्ही काळजी घ्या. आता कसंय बरं वाटतंय ना? तुम्हाला लवकरचं बरं वाटेल. तुम्ही काळजी करू नका. जे काही लागेल त्याची व्यवस्था मी डॉक्टरांना करायला सांगितली आहे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी वारकऱ्यांना व्हिडिओ कॉलवरून सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करून जखमी वारकऱ्यांच्या तब्येतीच्या संदर्भात माहिती घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी दर्शविली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डॉक्टरांना फोन करतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना निर्देश देताना दिसत आहेत. “जखमी वारकऱ्यांची काळजी घ्या. गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करा. त्यांचा खर्च मी करतो. ते आपले वारकरी आहेत”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉक्टरांना फोनवर सांगताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
विप्रोमधील नोकरी सोडून युट्यूबवरून कमावतोय करोडो, जाणून घ्या अरूण कुशवाहाविषयी
आलिया भट्ट बनली ‘कभी खुशी कभी गम’मधील काजोल, रणवीर सिंगसोबतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
मनसेच्या वसंत मोरेंचे शिंदे सरकारला चॅलेंज, म्हणाले, जर तुमच्यात हिंम्मत असेल तर…