राज ठाकरे यांचा ‘तो’ मुद्दा मुख्यमंत्र्यांना पटला! गृहविभागाला दिले तातडीचे आदेश…

मुंबई । परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांची नोंद ठेवणे गरजेचे आहे. असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. तसेच रिक्षाच्या अनधिकृत हस्तांतराविषयी मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाला सूचना केल्या आहेत. महिलांवर सध्या अत्याचार वाढले आहेत. यामुळे मुख्यमंत्र्यांनी गृहविभागाशी चर्चा केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे मुद्दे उपस्थित केले होते, यामुळे हेच मुद्दे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पटले आहेत. याबाबत त्यांनी सूचना दिल्या आहेत. या बैठकीत त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. राज्यातील माता भगिनी सुरक्षित राहीलाच हव्यात, अत्याचारातील नराधमांना वचक बसवा, अशा सूचना त्यांनी गृहविभागाला दिल्या आहेत.

महिला अत्याचाराबाबत मुख्यमंत्र्यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी गृहविभागाला आपण पूर्ण पाठबळ देत आहोत, असे त्यांनी सांगितले. शक्ती कायदा संयुक्त समितीचा अहवाल आगामी अधिवेशनात सादर करणार, असे गृहमंत्र्यांनी देखील सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गुन्ह्यात रिक्षाचा वापर झाला आहे, यामुळे रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतराला आळा कसा बसेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी आता परवानगी घेणे आवश्यक आहे. याबाबत नोंदणी करताना स्थानिक पोलिसांना परवानगी मागणे बंधनकारक करण्यात आले आहे.

इतर राज्यातून जे येत आहेत, ते कुठून कुठे जातात याची माहिती ठेवावी लागणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ठ केले आहे. परराज्यातून जे येतात त्यांची नोंद ठेवण्याची मागणी मनसेने केली होती. यावर आता मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे.

साकीनाका बलात्कारानंतर परप्रांतीय आणि रिक्षाच्या अनधिकृत हस्तांतरणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता, यामुळे राज्य सरकारवर टीका केली जात होती. या बलात्काराच्या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.