Homeताज्या बातम्यामुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणे भाजप नगरसेविकेच्या पतीला पडले महागात; पोलीसांनी केली अटक

मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणे भाजप नगरसेविकेच्या पतीला पडले महागात; पोलीसांनी केली अटक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल नवी मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. या भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्याचं नाव संदीप म्हात्रे आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट भाजप कार्यकर्ता जितेन गजारियावर केलेली कारवाई ताजी असताना आणखी एका भाजप पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

संदीप म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. तसेच ती पोस्ट व्हायरल करण्याचा प्रयत्न देखील केला होता. मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे काही शिवसैनिकांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात जाऊन भाजप पदाधिकारी संदीप म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

कोपरखैरणे पोलिसांनी कलम १५४ अ अंतर्गत संदीप म्हात्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि आज त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या पूर्वी देखील त्यांच्याविरोधात मारहाणीच्या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला होता. संदीप म्हात्रे यांच्या पत्नी नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपच्या नगरसेविका आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल संदीप म्हात्रे यांनी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यांनतर शिवसैनिकांनी त्यांना समजावून माफी मागण्यास सांगितले. पण भाजप पदाधिकारी संदीप म्हात्रे यांनी माफी मागण्यास नकार दिला. संदीप म्हात्रे यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावतीने शिवसैनिकांची माफी मागितली होती. पण संदीप म्हात्रे काही माफी मागायला तयार नव्हते. त्यामुळे शिवसैनिकांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंदवला.

पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन थेट कारवाईला सुरवात केली. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी संदीप म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार दाखल करून त्यांना अटक केली. याप्रकरणात पोलीस आणखी तपास करत आहेत. संदीप म्हात्रे हे नवी मुंबईतील कोपरखैरणे भागातील माजी नगरसेवक असून भाजप आमदार गणेश नाईक यांचे खंदे समर्थक आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करुन प्रसिद्धी मिळवण्याचा संदीप म्हात्रे यांचा प्रयत्न होता. आगामी काळात येणाऱ्या नवी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी अशापद्धतीने प्रसिद्धी मिळवून मतांचं गणित बांधता येईल, असा संदीप म्हात्रे यांचा प्रयत्न होता. पण त्यांचा हा प्रयत्न अंगलट आला, अशी चर्चा सध्या नवी मुंबईत सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या :-
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलीला झाला कोरोना; अंत्यसंस्कारावेळी उपस्थित सर्वांचीच चिंता वाढली…
…म्हणून मी चालत्या दुचाकीवर गर्लफ्रेंडला किस करत होतो; पोलिसी खाक्या दाखवताच तरूणाने सांगीतले कारण
डान्सिंग डॉल म्हटलं म्हणून संतापल्या अमृता फडणवीस; राष्ट्रवादी नेत्यावर केला अब्रुनुसानीचा गुन्हा दाखल