‘त्यांची खुर्ची कधी जाईल या भीतीने मुख्यमंत्री दु:खी’, गडकरींची जोरदार टोलेबाजी

मुंबई । भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या कामाच्या आणि बोलण्याच्या शैलीमुळे सतत चर्चेत असतात. ते कधी काय बोलतील सांगता येत नाही. मग ते आपल्या पक्षातील नेत्यांना देखील खडे बोल सुनावतात. आता राजस्थानमध्ये एका कार्यक्रमात गडकरी यांनी मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार टोलेबाजी केली आहे.

यानंतर एकच हशा पिकला, यावेळी गडकरी म्हणाले, की आजकाल प्रत्येकाला काही ना काही समस्या आहेत. प्रत्येकजण दु:खी आहे. मंत्रिपद न मिळाल्याने आमदार दु:खी आहेत. चांगले खाते न मिळाल्याने मंत्री दु:खी आहेत. तर जे मुख्यमंत्री बनले आहेत ते सुद्धा दु:खी आहेत.

कधी मुख्यमंत्री पद जाईल याची त्यांना भीती सतावत आहे. यामुळे मुख्यमंत्री देखील दुःखी आहेत. ते राजस्थानमध्ये बोलत होते. राजकारणाचा मुख्य उद्देश हा सामान्य नागरिकांच्या आयुष्यात बदल घडवून आणणे आहे. परंतू आजकाल ते केवळ सत्ता मिळवण्यासाठी असल्याचे बघायला मिळते.

सर्वांना लाभ मिळवून देणे हा मुख्य उद्देश लोकशाहीचा आहे, असेही ते म्हणाले, भाजपकडून अचानक मुख्यमंत्री बदलले जात आहेत. यातच गडकरी यांचे हे वाक्य चर्चेचा विषय ठरत आहे. कर्नाटकातही बीएस येडियुरप्पा यांच्या जागी बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रिपदावर संधी देण्यात आली.

उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्रसिंह रावत यांच्या जागी तिरथ सिंह रावत यांना आणण्यात आले. नंतर ते बदलून पुष्कर सिंह धामी यांना मुख्यमंत्रिपदावर बसवण्यात आले. आसाममध्ये देखील असेच करण्यात आले आहे. यामुळे याची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

नितीन गडकरी हे काय असेल तर बोलून जातात. अनेकांसमोर ते अनेक मोठे खुलासे करतात. राजकारण बाजूला सोडून देऊन ते विकास कामावर लक्ष देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतात अनेक मोठ्या रोडची कामे सुरू आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.