महाराष्ट्राच्या मदतीला धावला ‘या’ राज्याचा मुख्यमंत्री; राज्याला दिले ३०० व्हेंटीलेटर्स

मुंबई । महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. सध्या व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड्स देखील उपलब्ध होत नाहीत. यामुळे अनेकांचे जीव देखील जात आहेत. यामुळे आता आंध्र प्रदेश आपल्या मदतीला धावून आला आहे.

भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस जगनमोहन रेड्डी यांच्याकडे व्हेंटिलेटर्सची मागणी केली होती. नागपूरसाठी मुख्यमंत्री रेड्डी यांनी तब्बल ३०० व्हेंटिलेटर पाठवल्याबद्दल गडकरींनी त्यांचे आभार मानले आहेत.

व्हेंटिलेटर वेळेवर पाठवल्याबद्दल गडकरींनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुकही केले. राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. राज्यात मोठी भीषण परिस्थिती असताना ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा मोठा तुटवडा आहे.

यामुळे आता दिलासा मिळाला आहे. विशाखापट्टणममध्ये या व्हेंटिलेटर्सची निर्मिती करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश सरकारने सर्व कोविड रुग्णालयांना कोविड रुग्णांवर मोफत उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. आंध्र प्रदेशात सुरुवातीपासूनच लसीकरणावर भर दिला गेला.

इतर सर्व राज्यांनी लसीकरणावर लक्ष केंद्रीत करने फायद्याचे ठरणार आहे. लसीकरणाची आकडेवारी सरकारने जाहीर केली असता यामध्ये कोरोना बाधा होण्याचे प्रमाण फारच कमी आहे, यामुळे लसीकरण महत्त्वाचे आहे. मात्र लसीचा मोठा तुटवडा जाणवत आहे.

ताज्या बातम्या

जामखेडच्या डॉक्टरांचा नाद नाय! ना रेमडेसिवीर, ना महागडी औषधं, तरी कोरोना रुग्ण झटपट बरे

काळी मिरी, हळदीच्या मिश्रणातून कोरोनावर औषध! बारामतीच्या डॉक्टरांचे औषध झाले जगात फेमस

आमचा ट्रायो तुटला… ; सहकलाकाराच्या जाण्याने हळहळलेल्या जेठालालने लिहीली भावूक पोस्ट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.