भाजपने शिंदे गटाला पाठिंबा दर्शवल्यामुळे महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे कुटूंब देखील चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील राहत्या घरी आल्यानंतर त्यांची पत्नी लता शिंदे यांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले होते.(Chief Minister Eknath Shinde’s special post on his wife’s birthday)
एकनाथ शिंदे यांची पत्नी लता शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या पोस्टच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्नीचे आभार देखील मानले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिले आहे की, “जीवनातील बिकट आणि प्रतिकूल परिस्थितीत माझ्या पाठीशी तु खंबीरपणे उभी राहिलीस, सामाजिक आणि राजकीय जीवनात मी समर्पित होऊन कार्यरत असताना आपल्या संसाराचा गाडा जबाबदारीने व अतिशय मायेने हाकलास.”
“तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ, मनमिळाऊ पत्नी लाभणे हे मी नक्कीच माझे बलवत्तर नशीब समजतो. लता, वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा….”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://www.facebook.com/mieknathshinde/posts/641307747352966
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधी सोहळयाला संपूर्ण कुटूंब उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांची पत्नी लता शिंदे देखील उपस्थित होता. यावेळी एकनाथ शिंदे यांचे नातवासोबतचे काही फोटो व्हायरल झाले होते. नुकतीच आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते पार पडली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चार पिढ्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पूजेसाठी हजर होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे देखील या पूजेसाठी उपस्थित होते. तसेच एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे पत्नी आणि मुलासह उपस्थित होते. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी लता शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या :-
अखेर उद्धव ठाकरे नरमले, उद्धव ठाकरे काँग्रेस-शिवसेनेला धक्का देत घेणार मोठा निर्णय
उद्धव ठाकरेंचं निष्ठावान 15 आमदारांना भावनिक पत्र; वाचा काय म्हंटलं आहे पत्रात…
चुकीला माफी नाही! गद्दार आमदार संतोष बांगर यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी; बांगर म्हणाले…