Share

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भर विधानसभेत जाहीर सवाल, म्हणाले, ‘आम्ही गद्दार असतो तर…

Eknath Shinde

Eknath Shinde : गेल्या पाच दिवसांपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी अधिवेशन चांगलेच गाजवले. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर प्रचंड टीका केली.

काल तर विधिमंडळाच्या बाहेर सत्ताधारी आणि विरोधक प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली. यावरूनही दोन्ही बाजूने प्रचंड टीकाटिपण्णी झाली.

आतापर्यंत शिंदे गटातील नेत्यांना विरोधक गद्दार म्हणून डिवचत होते. मात्र, विरोधकांनी आज चक्क मुख्यमंत्र्यांचा कंत्राटी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. या सगळ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत चोख प्रत्युत्तर दिले आहे. “मी कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून कधीही बरा,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली नाही. काँग्रेसला जवळ करायचं नाही, त्यांना जर कधी जवळ करायची वेळ आली तर मी माझं दुकान बंद करेल, असे बाळासाहेब म्हणाले होते. आम्ही त्यांचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत.” तसेच आम्ही गद्दार असतो तर आमच्या स्वागतासाठी एवढी गर्दी झाली असती का?, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना विचारला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यांना जेवणाच्या ताटावरून उठवून तुरुंगात टाकले होते, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी यावेळी जयंत पाटील यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, जयंत पाटील काल राष्ट्रीय प्रवक्त्यासारखे बोलत होते. जयंत पाटील यांनाच विरोधी पक्षनेता व्हायचं होतं. पण त्यांना ते होता आलं नाही. ते पद अजित पवारांना देण्यात आलं, असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या
ED : आतापर्यंत अनेकांना नोटीस देणाऱ्या ईडीलाच कोर्टाची नोटीस; वाचा काय आहे प्रकरण
सत्ताधारी असून पायरीवर बसवलय वाघाने, ३२ वर्षांच्या पोराने तुम्हाला घोडे लावलेत
तारक मेहता..च्या बबिताजींनी बनारसी साडी आणि केसात गजरा लावून घातला धुमाकूळ, चाहते झाले वेडे, पहा फोटो
नेहमी शांत संयमी असणारे नितीन गडकरी का संतापले? म्हणाले त्यांना मी सोडणार नाही…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now