“दरेकरांनी अडवली मुख्यमंत्र्यांची गाडी, नार्वेकर म्हणाले, साहेब यांना गाडीत टाका आणि शिवबंधन बांधा”

मुंबई । आज विधानभवन परिसरात एक किस्सा घडला. एरवी एकमेकांवर आरोप करणारे आज एकमेकांसोबत हसताना दिसले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या ठिकाणी होते. एवढेच नाही तर उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाययक मिलिंद नार्वेकर यांनी तर चक्क विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आणि भाजप नेते प्रसाद लाड यांच्या मनगटावर शिवबंधन बांधण्याची इच्छा व्यक्त केली.

झाले असे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान भवनातील बैठक संपवून गाडीतून जात होते. यावेळी अचानक विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि गिरीष महाजन तिथे आले. यावेळी सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे गेले.

यावेळी नार्वेकर आणि या तिन्ही नेत्यांमध्ये गंमतीदार संवाद झाला. मिलिंद नार्वेकर यावेळी म्हणाले साहेब, यांनी तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे का? त्याचवेळी दरेकर म्हणाले. आम्ही केव्हाही येऊ शकतो. दरेकरांचे हे वाक्य ऐकताच नार्वेकर म्हणाले यांना आताच गाडीत टाका, शिबबंधन बाधूया, हे ऐकून दरेकर म्हणाले आम्ही केव्हाही एकत्र येऊ शकतो, हे आमचे मूळ आहे.

हे ऐकून सर्वांचा हशा पिकला. हा एक गमतीशीर संवाद होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत वातावरण काहीसे ठीक नाही. यातच भाजप शिवसेना पुन्हा एकत्र येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच शरद पवार हे दिल्लीत आहेत. यामुळे चर्चा सुरू आहे.

दोन दिवसांपूर्वी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहील्यामुळे एकच खळबळ उडाली होती. भाजपसोबत जुळवून घ्या असे त्यांनी सांगितले होते. यामुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपले कार्यकर्ते फोडत आहेत. आपल्याला त्रास होत आहे, अशा प्रकारे या पत्रात त्यांनी लिहिले असल्याने चर्चांना उधाण आले होते. यामुळे हे सरकार किती दिवस टिकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

ताज्या बातम्या

मोठी बातमी! टीआरपी घोटाळा प्रकरणी आरोपपत्र सादर, अर्णब गोस्वामी आरोपी घोषित

हनिमूनच्या पहिल्या रात्रीच झाले असे काही की नवरा-नवरीला हॉस्पिटलमध्ये करावे लागले दाखल

कोरोना योद्ध्याला सलाम! पाठीवर बाळ, हातात कोरोना लसींचा बॉक्स आणि कमरेपर्यंत नदीचे पाणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.