“ठाकरे सरकारला स्वत:ची चुक कळली; राज ठाकरेंची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली मान्य”

मुंबई | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे लस, ऑक्सिजन, बेड यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. कोरोनामुळे गंभीर वातावरण निर्माण झालं आहे.

कोरोनावर निर्बंध आणण्यासाठी सरकार कडक नियम लागू करत आहे. कोरोना काळात हातावर पोट असलेल्यांसमोर मोठं संकट आलं आहे. अनेकजणांना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. काम मिळत नसल्याने कामगारांनी गावाकडची वाट धरली आहे.

दुसऱ्या राज्यातील मजूर पोटापाण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर येत असतात. लॉकडाऊनमध्ये कामगार गावाकडे गेले होते. मात्र कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर कामगार महाराष्ट्रात पुन्हा परतले होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षभरापुर्वी ठाकरे सरकारकडे एक मागणी केली होती. दुसऱ्या राज्यातून आलेल्या कामगारांची नोंद, त्यांची आरोग्य तपासणी केली पाहिजे. असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.

आता वर्षभराने का होईना मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांची मागणी मान्य करत अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, गेल्या कित्येक दिवसांत मजूर आपआपल्या राज्यात जात आहेत. राज्यातील कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर हे कामगार परत येतील.

मात्र कामगार परतल्यानंतर आपल्या बरोबर संसर्ग आणत नाही ना याची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर आपण कोरोना रोखण्यासाठी जे प्रयत्न करतोय ते वाया जातील. त्यामूळे या कामगारांची नोंद उद्योग व्यवसाय, कंत्राटदारांकडून व ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी. जेणेकरून त्यांच्या चाचण्या विलगीकरण याबाबत ठरवता येईल. असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
सलाम! पत्नीचे दागिने विकून रिक्षालाच बनवलं अ‍ॅम्बुलन्स; गोरगरीबांना देतोय मोफत सेवा
या नागरीकांना मिळणार नाही कोरोना लसीचा दुसरा डोस; सरकार लसीकरणाची रणनिती बदलण्याची शक्यता
सोलापुरच्या त्या दीड कोटीच्या मोदी बकऱ्याचा मृत्यू; मालकाने स्वत:च्या मुलासारखा केला होता सांभाळ
इरफान खानला झाला होता मृत्यूचा पुर्वाआभास; मुलाने केला खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.