तुला कापू का? कोंबडी म्हणते नको-नको, सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई | जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला. या कोरोना महामारीचा प्रभाव कमी होतो नाही तोपर्यंतच बर्ड फ्लूचं संकट देशावर आले. यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशात सांगलीतील एका कोंबडीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये कोंबडीला कापू का विचारले असता ती नको-नको असं म्हणते.

एका चिकन दुकानात चक्क कोंबडीच मला कापू नका म्हणत असल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. कोंबडी तीची मुंडी हलवून मला कापू नका असे सांगते आहे.

चिकन दुकानातील माणूस हातात सुरा घेऊन तुझे कापू क्या.. असं म्हणल्यानंतर कोंबडी जोरा-जोरात मुंडी हालवते. दुकानदार पुन्हा तसंच विचारतो तर कोंबडी पुन्हा मुंडी हलवते. कोंबडी तिची मुंडी हलवून मला कापू नका असे म्हणत असल्याचे वाटत आहे. यानंतर दुकानदाराने या कोंबडीला कापले नाही.

दरम्यान हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असला तरी बर्ड फ्लूमुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात लाखो कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक पोल्ट्री फार्मवर कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. अशात हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
बारमध्ये दारु पिऊन तरुण-तरुणींमध्ये तुफान हाणामारी, पहा संपुर्ण व्हिडीओ
भारतात नोकरदारांसाठी चालू वर्षात ‘या’ क्षेत्रात नोकऱ्यांची असेल जास्तीत-जास्त संधी, इथे पाहा तुमचं क्षेत्र
सोनाली कुलकर्णीचा साखरपुडा झाला; फोटो पाहून म्हणाल, काय दिसतेय अप्सरा…
हृदयस्पर्शी चरणस्पर्श..! ‘लाईफलाईन’ रुळावर आल्यानंतर वंदन करताना सामान्य मुंबईकर, पाहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.