काय सांगता! चिकनपेक्षा मेथी महाग, भाज्यांचे दर शंभरीपार, शेतकरी सुखावला

नागपूर । शेतकऱ्यांच्या भाज्यांना कधी दर मिळेल आणि कधी नाही हे सांगता येत नाही. कधी शेतमाल रस्त्यावर फेकून द्यावा लागतो, तर कधी शेतकऱ्याला भाव मिळून त्याचे नशीबच पालटते. आता पितृपक्ष पंधरवड्यामुळे मागणीत झालेली वाढ यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत.

राज्यात मुंबई, नागपूर आणि पुण्यात भाजीपाला महागला आहे. नागपूरमध्ये तर चिकनपेक्षा मेथी महागली आहे. नागपूरमध्ये एक किलो मेथी 340 रुपयांना मिळत आहे. यामुळे आता काय खायचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पुण्यात देखील भाजील्याचे दर महागले आहेत. अवेळी पावसामुळे घटलेले उत्पादन, इंधन दरवाढ आणि आता पितृपक्ष पंधरवड्यामुळे मागणीत झालेली वाढ यामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत.

काही दिवसांपूर्वी रस्त्यावर फेकून दिला जाणारा टोमॅटो आता ४५ रुपयांवर पोहोचला आहे. गवारही १०० रुपये किलो अशी विकली जात आहे. कांदा, बटाटा सोडला तर सर्व भाज्या महाग झाल्या आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले आहेत.

पावसामुळे सध्या आवक देखील कमी झाली आहे. घाऊक बाजारात वाढ झाल्याने या सर्व भाज्या किरकोळ बाजारात दुप्पट ते तिप्पट दराने विकल्या जात आहेत. मात्र शेतकऱ्यांना कमी पैसे मिळत असून व्यापारीच मोठ्या प्रमाणावर पैसे मिळवत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खचार्त वाढ देखील झाली आहे. यामध्ये मेथी ३४० रुपये किलो, कोबी १२० रुपये किलो, गवार १४० रुपये किलो, पालक १२० रुपये किलो, वांगी १२० रुपये किलो, भेंडी १२० रुपये किलो, कोथिंबीर १२० रुपये किलो, शेवगा १२० रुपये किलो, अशी वाढ झाली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.