Share

Chicken Price: ऐन श्रावणात चिकन ५० टक्क्यांनी स्वस्त, तर अंड्याचे 35 टक्क्यांनी भावही घसरले, वाचा किंमत

Chicken -Price,

चिकनची किंमत(Chicken Price): गेल्या काही दिवसात विविध राज्यांमध्ये चिकनच्या दरात २५ ते ५० टक्क्यांनी घट झाली आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये चिकनच्या दरात सर्वाधिक घसरण दिसून आली आहे. महाराष्ट्रात कोंबडीचा शेतमालाचा दर ११५ रुपये किलोवरून ६० रुपये किलोवर आला आहे. त्याच वेळी, झारखंडमध्ये त्याची किंमत ५० रुपये प्रति किलोपर्यंत कमी करण्यात आली आहे.(Shravan, Chicken Price, Maharashtra, Chhattisgarh, Meat, Poultry Breeders Association of India, Dr. Vasant Kumar Shetty)

श्रावण महिन्यात उत्तर भारतात बरेच लोक मांसाहार सोडून देतात. यामुळे मांसाहार खाणार्यांची संख्या कमी होते. दुसरीकडे, देशातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे कोंबड्यांचे वजन वाढल्याने शेतकऱ्यांना कमी भावाने कोंबडीची विक्री करावी लागत आहे.

पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे संयोजक डॉ. वसंतकुमार शेट्टी म्हणाले, “गेल्या काही दिवसात फार्म गेट चिकनचे दर ११५ रुपये प्रति किलोवरून ६० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत. उत्पादन खर्चाच्या तुलनेत हे कमी आहे. किंमती खूप जास्त कमी झाल्या आहेत.

त्यापेक्षा महाराष्ट्र आणि छत्तीसगड मध्ये अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात किमती कमी झाल्या आहे जिथे आत्ताशी कुठे श्रावण सुरूही झालेला नाही. पोल्ट्री क्षेत्राशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की उत्तर भारतात १५ जुलै रोजी श्रावण सुरू झाल्यामुळे मागणीत लक्षणीय घट झाली. तथापि, जूनमध्ये वाढलेल्या किमतींमुळे एकूण ग्राहकांची मागणी कमी झाली होती, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

देशभरातील किमती अपेक्षेपेक्षा जास्त घसरल्या आहेत हे समजण्यात इंडस्ट्री आतापर्यंत अपयशी ठरली आहे. दुसरीकडे, हवामानातील बदलासारख्या घटकांचा परिणामही ट्रेंडवर दिसून आला आहे. दुसरीकडे देशातील विविध शहरांमध्ये अंड्यांचे दरही ३० ते ३५ टक्क्यांनी कमी झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या
या फार्मची अंडी आणि चिकन खातो धोनी, किंमत आणि खासियत वाचून हैराण व्हाल
तुझ्याबाबत आमच्या मनात तीळमात्र शंका नाही; गद्दारीचा आरोप असलेल्या आमदाराची पवारांकडून पाठराखण
राष्ट्रवादी धावली अपक्ष आमदारांच्या मदतीला; गद्दारीचे आरोप फेटाळत सेनेलाच सुनावले खडे बोल

आर्थिक इतर तुमची गोष्ट

Join WhatsApp

Join Now