कोरोनामुळे छोटा राजनचा मृत्यू झाल्याची बातमी खरी की खोटी? एम्सने दिली खरी माहिती

देशभरात कोरोनाच्या संकटाने कहर घातले आहे. त्यामुळे अनेक लोकांचा कोरोनामुळे मृत्यु होत आहे. अशात कुख्यात गुंड छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. पण आता एम्सने महत्वाची माहिती दिली आहे.

छोटा राजन जिवंत असल्याची माहिती माहिती एम्सने दिली आहे. काही दिवसांपुर्वी छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याचे वृत्त पसरले होते. कोरोना संक्रमित झाल्याने ६२ वर्षीय छोटा राजनला तिहाड जेलमधून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात भर्ती केले होते.

काही दिवसांपुर्वी अफवा पसरली होती, की छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. पण आता एम्सच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन अजून जिवंत आहे. कोरोना संक्रमित असल्यामुळे एस्म रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहे.

छोटा राजन विरोधात अनेक गुन्हा दाखल आहे. ज्यामध्ये ४ गुन्हांमध्ये कोर्टाने त्याला शिक्षा दिलेली आहे. छोटा राजनला तिहाड जेल नंबर २ च्या अतिरिक्त सुरक्षा वार्डमध्ये ठेवण्यात आलेले होते. मात्र कोरोना झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

छोटा राजनला मुंबईचे जेष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांची हत्या केल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे. छोटा राजनवर अपहरण आणि हत्याचे ७० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे.

दरम्यान, २०१५ मध्ये त्याला इंडोनेशियामधून पकडून आणले होते. त्यानंतर त्याला मुंबईच्या जेलमध्ये ठेवण्यात येणार होते. पण संरक्षणाच्या काही कारणांमुळे त्याला तिथे ठेवण्यात आले नाही. त्यानंतर छोटा राजनला हाय सिक्युरीटीमध्ये तिहाड जेलमध्ये ठेवण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या-

उद्योगपतीच्या अंत्यसंस्कारात रडण्याचे मिळणार होते ५ लाख; चंकी पांडेने केला गोप्यस्फोट
महाराष्ट्राचे चार ऑक्सिजन टँकर गुजरातला पळवण्याचा प्रयत्न; शोध मोहिमेत धक्कादायक माहिती उघड
गर्दी केल्याने जाब विचारणाऱ्या पोलिसाला जमावाची पाठलाग करुन जबर मारहाण; पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.