Share

चहलचा IPL मध्ये धिंगाना! बायको धनश्रीला मैदानावरच दिला किस; पहा व्हायरल व्हिडीओ

आयपीएल २०२२ च्या पाचव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबाद(Sunrisers Hyderabad) संघाला धूळ चारली आहे. राजस्थान रॉयल्सने तब्बल ६१ धावांनी सनरायझर्स हैदराबाद संघाचा पराभव केला आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा खेळाडू युजवेंद्र चहलने सनरायझर्स हैदराबादचे तीन गडी बाद केले. आयपीएलच्या या हंगामात युजवेंद्र चहल पहिल्यांदाच राजस्थान रॉयल्स संघासोबत खेळत आहे.(chhal and wife dhanshri flying kiss viral video)

या सामन्यात युजवेंद्र चहलने अप्रतिम गोलंदाजी करत राजस्थान रॉयल्सच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. युजवेंद्र चहलने या सामन्यात ४ षटकात २२ धावा देत ३ गाडी बाद केले आहेत. या सामन्यात विरोधी संघाच्या खेळाडूंची विकेट घेतल्यानंतर युजवेंद्र चहलने एका हटके पद्धतीने आनंद साजरा केला आहे.

या सामन्यादरम्यान युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री देखील स्टेडियममध्ये उपस्थित होती. युजवेंद्र चहल विकेट घेतल्याचा आनंद साजरा करत असताना पत्नी धनश्री त्याचा फोटो टिपण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी युजवेंद्र चहलने पत्नी धनश्रीला एक फ्लाइंग कीस दिला. युजवेंद्र चहलचा आणि धनश्रीचा हा फोटो राजस्थान रॉयल्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.

हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोला सोशल मीडियावर जवळपास ३ लाख ७० हजार लाइक्स मिळाले आहेत. अनेकांनी क्रिकेट चाहत्यांनी या फोटोवर कमेंट देखील केल्या आहेत. राजस्थान रॉयल्स संघात सामील होण्यापूर्वी युजवेंद्र चहल रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर संघाकडून सामने खेळायचा.

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करत २१० धावा केल्या. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने तुफान फटकेबाजी केली. त्याने २७ चेंडूत तब्बल ५५ धावा केल्या. या सामन्यात संजू सॅमसनने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील १६ वे अर्धशतक झळकावले. संजू सॅमसनचा राजस्थानसाठी हा १०० वा सामना होता.

सनरायझर्स हैदराबाद संघाने या सामन्यात सावध सुरवात केली. पण त्यांना या सामन्यात विजय मिळवता आला नाही. सनरायझर्स हैदराबाद संघाने या सामन्यात २० षटकात ७ बाद १४९ धावा केल्या. राजस्थान रॉयल्स संघाने सनरायझर्स हैदराबादचा ६१ धावांनी पराभव केला. २७ मार्चपासून आयपीएलच्या नवीन हंगामाला सुरवात झाली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘या’ कायद्याच्या आधारे ईडी करत आहे आघाडीच्या मंत्र्यांवर कारवाया; जाणून घ्या काय आहे PMLA कायदा
“सुख म्हणजे नक्की काय असतं” मालिकेतील अभिनेता विवाहबंधनात; ‘या’ कलाकारांची हजेरी
ऍपल वॉचच्या मदतीने करत होता गर्लफ्रेंडचा पाठलाग, बॉयफ्रेंडची युक्ती पाहून पोलिसही चक्रावले

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now