Share

Uddhav Thackeray : छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली, पण एक काम चांगलं केलं ते म्हणजे…; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

Chhagan Bhujbal, Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त एका कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अनेक नेत्यांनी भाषणे दिली होती. उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार यांनीही यावेळी भाषणे दिली. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी भाषणामध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.(Uddhav Thackeray, Chhagan Bhujbal, Sharad Pawar, Ajit Pawar,)

छगन भुजबळ हे आधी शिवसेनेत होते. पण काही कारणांमुळे त्यांनी शिवसेना सोडली होती. शिवसेना सोडणे हा शिवसेनेसाठी मोठा धक्का होता. पण त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे ठाकरे कुटुंबालाही याचा धक्का बसला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात भाष्य केलं होतं.

छगन भुजबळांनी जेव्हा शिवसेना सोडली, तेव्हा ठाकरे कुटुंबियांना मानसिक धक्का बसला होता. त्यावेळी भुजबळांनी मातोश्रीवर येत सर्वभेद मिटवले होते. पण त्यांनी शिवसेना सोडायला नको होती, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. यावेळी भाषण करताना उद्धव ठाकरे जुन्या आठवणीत रमून गेल्याचे दिसून आले. त्यावेळी छगन भुजबळ सुद्धा भावूक झाल्याचे दिसून आले.

उद्धव ठाकरे हे जेव्हा भाषण देत होते. तेव्हा छगन भुजबळ हे व्यासपीठावर बसलेले होते. त्यावेळी ते कोणत्या तरी विचारात खुप मग्न झालेले होते. त्यांनी शिवसेना सोडायला नको होती हे शब्द कानावर पडताच छगन भुजबळ भावूक झालेले पाहायला मिळाले. त्यांच्या बाजूलाच शरद पवार बसलेले होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली हा ठाकरे कुटुंबियांसाठी मोठा धक्का होता. आपल्या कुटुंबातील माणूस आपल्याला कसा सोडून जाऊ शकतो, असे सर्वांना वाटत होते. त्यातून आम्हाला सावरायला खुप वेळ लागला होता. कारण तो ठाकरे कुटुंबियांसाठी खुप मोठा धक्का होता.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, एक गोष्ट चांगली झाली की बाळासाहेब असताना तुम्ही सर्व गोष्टी मिटवून टाकल्या. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत जम बसवला. आज भुजबळ हे राष्ट्रवादीचे उत्तुंग नेते म्हणून ओळखले जातात. भुजबळ हे अजूनही तरुण आहेत.

महत्वाच्या बातम्या
uddhav thackeray : ठाकरेंसाठी ‘मशाल’ ठरणार गेमचेंजर! फक्त अंधेरीच नव्हे तर अख्या मुंबईसाठी आखली ‘ही’ खास रणनिती
Anand Mahindra : डिंफेस आणि पॅरामिलीटरीसाठी बनवली जबरदस्त ‘स्पायडर कार’, आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडीओ
girish mahajan : सत्तेचा माज! शाळेतील लहान्या लेकरांना गिरीश महाजनांची अर्वाच्च भाषेत दमदाटी; रेकाॅर्डींग व्हायरल

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now